Download App

Eknath Shinde: लोकशाही, बहुमताचा, सत्याचा विजय

  • Written By: Last Updated:

मुंबईः शिवसेना (Shivsena पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) गटाला मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा लोकशाही आणि बहुमताचा, सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंवर मात्र त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. यावर मी बोलणार नाही, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या बाजूने निवडणूक आयोगाने निर्णय देणे हा लोकशाही आणि बहुमताचा विजय आहे. हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवारी आनंद दिघे यांचा विजय आहे. पक्षातील व इतर ५० आमदार, १३ खासदारांचा, शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा सत्याचा विजय आहे. मी माझी भूमिका घेतली होती. ती निवडणूक आयोगाने योग्य ठरविली आहे. आयोगाचे मी आभार मानतो.
Devendra Fadnavis : नाव व चिन्ह मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो
देशात घटना आहे. कायदा आहे, आमचे सरकार ही कायद्याच्या आधारवर चालत आहे. निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलेला हा निर्णय आहे, असे शिंदे म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. सगळं बहुमत आमच्यासोबत आहे. मेरिटवर निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे मी जास्त यावर बोलणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=hi39ajqZk3w
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यात हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाची पाच न्यायमूर्तींसमोर चालणार आहे. हा उद्धव ठाकरे गटासाठी धक्का होता. त्यानंतर आज संध्याकाळी भारत निवडणूक आयोगाचा निर्णय ठाकरेंसाठी धक्का आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हा चिन्ह मिळाले असल्याने या गटाकडून राज्यभरात जल्लोष सुरू आहे.

Tags

follow us