Download App

वळसे पाटलांना धक्का देणारे बंडखोर निकम म्हणतात, ‘ते माझे दैवत; संधी दिल्यास लोकसभा लढणार’

  • Written By: Last Updated:

Muncher Apmc Election : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. पंधरा जागांपैकी 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी सभापती देवदत्त निकम (Devadatta Nikam) देखील निवडून आले आहेत. निकम यांचा विजय हा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का मानला जात आहे. विजयी झाल्यानंतर वळसे पाटील हे माझे दैवत आहेत, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे.

माजी सभापती देवदत्त निकम म्हणाले की माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी व्हावेत म्हणून मी चप्पल न घालता अनवाणी फिरुन प्रचार केला. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. वळसे पाटील हे माझे दैवत आहेत.

यापुढं तुमची वाटचाल काय असेल? या प्रश्नावर निकम म्हणाले की आगामी लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली तर लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी आहे. वेळ येईल त्यावेळी आणखी स्पष्टपणे बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंवर भूंकण्यासाठी भाजपने राणे पिता – पुत्र पाळलेत; राऊतांचा घणाघात

दरम्यान मंचर बाजार समितीच्या 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना-भाजप युतीने आपला पॅनल उभा केला होता. मात्र युतीच्या पॅनेलला पराभावाचा सामना करावा लागला आहे. बाजार समितीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत पंधरा जागांसाठी निवडणू लागली होती. त्यातील 14 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला असून बंडखोर निकम हे निवडून आले आहेत.

माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वळसे पाटलांपासून दूर गेलेल्या एकाही नेत्याला आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत विजय मिळविता आलेला नव्हता. अपवाद फक्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा होता. मात्र निकम यांनी ती परंपरा खंडीत केली आहे.

Tags

follow us