ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने राणे पिता-पूत्र पाळलेत; राऊतांचा घणाघात

ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने राणे पिता-पूत्र पाळलेत; राऊतांचा घणाघात

Vinayak Raut criticizes Nitesh Rane : : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी होते. ते लवकर आजारपणातून बाहेर येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान, नितेश राणेंच्या या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे, नितेश राणे हे गॉन केस आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने यांना पाळले असल्याची खरमरीत टीका राऊत यांनी केली.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
उद्धव ठाकरे हे आजारी असताना आदित्य ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत, त्यांची तब्येत बारी होणार नाही. त्यासाठी जसलोक रुग्णालयातील एका खोलीत बैठका झाल्या. रुग्णालाच्या कोणत्या खोलीत या बैठका झाल्या हे मला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील मी देऊ शकतो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणार’

तसेच आदित्य ठाकरे यांच्या या षडयंत्राला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला होता. त्यांनतर हे प्रकरण थांबलं, असंही राणे म्हणाले आहे. दरम्यान आता राणे यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरे कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच राणे यांच्या या विधानावर ठाकरे गटातील नेते काही बोलणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

बहीण हरली, भाऊ जिंकला…धनंजय मुंडेंचा परळीत पंकजा ताईंना व्हाईट वॉश!

नारायण राणे व नितेश राणे गॉन केस
नितेश राणेंना आम्ही फार किंमत देत नाही. त्यांना गांभीर्याने घेण्याचीही गरज नाही. नारायण राणे आणि नितेश राणे हे गॉन केस आहे. त्यांना भाजपाने केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर भुंकण्यासाठी पाळलंय आहे, असं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube