Download App

मोठी बातमी : मनिषा कायंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, खासदार विनायक राऊतांची माहिती

  • Written By: Last Updated:

Manisha Kayande : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानंतरही मुळ शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत गेले. अजूनही गळती थांबण्याचे दिसत नाही. आता आमदार मनिषा कायंदे ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता ठाकरे गटाने मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांची प्रवक्ते (उबाठा) पदावरून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. (Manisha Kayande’s dismissal from the post of spokesperson, MP Vinayak Raut’s information)

मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आदेशाने प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. राऊत यांनी ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक प्रसिध्द पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.

राहुरीचा डाव आता शिवाजी कर्डिले श्रीगोंद्यात टाकणार ? जगताप, पाचपुतेंना धडकी ! 

कायंदे या विधानपरिषद सदस्य आणि उबाठाच्या प्रवक्त्या आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी 11 वर्षे काम केले आहे. कायंदे महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवतात. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अवनी संस्थेच्या माध्यमातून स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून राजकारणाला सुरुवात केली. 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्ता झाल्या. तर 18 जुलै 2018 रोजी त्यांना विधान परिषद सदस्य पद मिळाले.

मनीषा कायंदे या आक्रमक नेत्या आहेत. वेळ पडली तेव्हा त्या आक्रमकपणे शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडली. शिवसेनेची ढाल बनून त्या नेहमी विरोधकांसमोर उभ्या राहिल्या. शिंदे यांच्या बंडानंतरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गटातील अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, त्यांची पक्षाने प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केल्यानं आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं नुकसान होऊ शकतं. कारण महानगरपालिकेतील राजकारणाचा कायंदे यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय, त्या ठाकरे गटातून बाहेर पडतांना तीन नगरसेवकांनाही सोबत घेऊन जातील, असं बोलल्या जातं.

Tags

follow us