राहुरीचा डाव आता शिवाजी कर्डिले श्रीगोंद्यात टाकणार ? जगताप, पाचपुतेंना धडकी !

  • Written By: Published:
राहुरीचा डाव आता शिवाजी कर्डिले श्रीगोंद्यात टाकणार ? जगताप, पाचपुतेंना धडकी !

Ahmednagar Politics: श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असते. आताही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. घनशाम शेलार (Ghansham Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) रामराम ठोकून आता बीआरएसमध्ये (BRS) मध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून यंदा तिकीट मिळणे अवघड वाटत असल्याने शेलार यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात आताच्या परिस्थितीनुसार तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. या मतविभागणीचा फायदा कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) हे चाचपणी करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. (shivaji-kardile-intersted-election-from-shrigonda-assembly-constituency)

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवारांची मदत; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट!

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहिलेले घनशाम शेलार यांनी थेट बीआरएस पक्ष गाठला आहे. श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे निश्चित झाले आहे. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार हे आमदार बबनराव पाचपुतेंविरोधात रिंगणात उतरले होते. त्यांनी जोरदार टक्कर दिली होती. राहुल जगताप हे उमेदवारी करतील, असे वाटत असताना एेनवेळी त्यांनी माघार घेतली आहे. यंदा मात्र ते जोरात तयार करताना दिसत आहे. त्यांनी बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे.

‘आम्हीही नाराजी व्यक्त केली पण आमच्यावर’.. कायदेंच्या पक्षप्रवेशावर पाटील स्पष्टच बोलले

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे ही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले अण्णासाहेब शेलारही चाचपणी करत आहेत. तर आमदार बबनराव पाचपुते हे आजारपणामुळे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात राहतील की नाही याची अनिश्चितता आहे. त्यात पाचपुते यांचा पुतण्या साजन पातपुते हा त्यांच्याविरोधात केला आहे. काष्टीसारख्या मोठे गाव साजन पाचपुते यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजप कोणाला तिकीट देते हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

त्यात भाजपसाठी नगरमधून शिवाजी कर्डिले यांच्या नावाचा तगडा पर्याय उपलब्ध आहे. नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील आणि वाळकी हे दोन जिल्हा परिषद गट श्रीगोंदा मतदारसंघात आहेत. या गटातील गावांवर कर्डिलेंचे वर्चस्व आहे. बाजार समितीचे सभापतीही कर्डिले यांनी वाळकी गटातून निवडला आहे. तसेच श्रीगोंद्यातील मांडवगण गटातून कर्डिलेंना मदत होऊ शकते. तेथे त्यांच्या सोयऱ्यांचे राजकीय वजन आहे.

श्रीगोंद्यातून चार ते पाच उमेदवार उभे राहिल्यास याचा फायदा नगरमधील उमेदवाराला होऊ शकतो. राहुरी मतदारसंघातून दोन वेळेस कर्डिले यांना मतविभागणीचा फायदा झाला होता. तोच डाव आता कर्डिले हे खेळण्याची शक्यता आहे. हक्काच्या दोन गटातील मतदार, भाजपच्या तिकीटावर पक्षाचे मिळणारे मते हे गणित त्या मागे आहेत. त्यामुळे कर्डिलेंकडून या मतदारसंघात चाचपणी सुरू आहे.

राहुरी मतदारसंघातून निवडून लढणार असल्याचे कर्डिले म्हणत असले तरी या बदलत्या राजकीय परिस्थितीत श्रीगोंद्यातून निवडून लढवावे, यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यावर पक्षाने कुठूनही लढविण्यास सांगितल्यास मी तयार आहे. जिंकण्यासाठी लढणार असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube