Eknath Khadse Vs Girish Mahajan : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अधिक वेळ न दवडता गिरीश महाजनांची (Girish Mahajan) रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वादंग सुरु आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राज्य सरकार आणि मराठा बांधवांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरही वादंग सुरु असून अशातच आता एकनाथ खडसे यांनी वादात मिठाचा खडा टाकल्याचं दिसून येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे कोणाचा हात? आंबेडकरांनी नाव घेऊन सांगितलं
एकनाथ खडसे म्हणाले, शरद पवारांनी काय केलं यापेक्षा तुम्ही काय करता आहे याला जास्त महत्व आहे. मराठ्यांना आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो अशी गर्जना तुम्ही केली होती. आताही मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आम्ही ओबीसीमधून आरक्षण देऊ, असे गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं ते आता टाळत असून तुम्ही काय दिवे लावतात ते महाराष्ट्राला समजले पाहिजे, असं खडसे म्हणाले आहेत.
CM यादव यांना उज्जैनमधील मुक्काम महागात पडणार? खुर्चीवर आठवड्याभरातच टांगती तलवार
तसेच मनोज जरांगे पाटलांनी सांगितलयं की तुम्ही जर 17 डिसेंबरपर्यंत योग्य निर्णय घेतला नाही तर माझ्याजवळ असलेली गिरीश महाजन यांची रेकॉर्डिंग मी व्हायरल करणार आहे. जरांगे पाटलांनी आता अधिक वेळ न घेता ती ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करुन महाराष्ट्रातील जनतेसमोर आणायला पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महाजनांचीही एसआयटी चौकशी करा :
भाजपमध्ये असताना दाऊदच्या बायकोसोबत माझं संभाषण झाल्याचा माझ्यावर आरोप झाला. या प्रकरणी माझी चौकशीही झाली. चौकशीत असं काही समोर आलं नाही. त्यामुळे पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता सलिम कुत्ता प्रकरणी सुधाकर बडगुजरची एसआयटी चौकशी करत आहात. पण सलिम कुत्तासोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतरही लोकं दिसत आहेत.
एसआयटी चौकशी करणार का? देशद्रोह्यांसोबत आता गिरीश महाजनांचे संबंध आहेत, त्याची चौकशी करणार का? असा सवाल खडसेंनी केला आहे. माझ्यावर आरोप झाले तेव्हा पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होताहेत, पुराव्यानिशी समोर येत आहेत. आता मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होईल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर चौकशी होईल. की महाजनांना वॉशिंगमध्ये धुन काढणार हे भाजपचं वैशिष्ट असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.