Manoj Jarange Audio Clip: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यातील वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंचं कौतुक करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता त्यांच्यावर 500 कोटी रुपयांवरून गंभीर आरोप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी केला. या आरोपांनंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले असून, जरांगेंनी पुरावे सादर करावेत, असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर जरांगेंनी आज एक ऑडिओ क्लिप ऐकवली.
मुंबई जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर! IQAir च्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
दरम्यान, मनोज जरांगे यांनी ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला आहे. ही क्लिप विधानसभा निवडणुकीच्या काळातील भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या आयटी सेलमधील एका महिला सदस्याने श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा केल्याचं सांगण्यात येत आहे.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
या क्लिपमध्ये संबंधित व्यक्ती पुढीलप्रमाणे बोलत असल्याचं सांगितलं जात आहे.
“जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये पहुंच चुके है…
श्रीकांत शिंदे के पाससे पहुंच चुके है…
जरांगे पाटील विधानसभा चुनाव में हमारे फायदे का रहेगा या नहीं रहेगा… इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है…
आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही…”
या कथित संभाषणातून मनोज जरांगे यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र, या संभाषणातील दाव्यांची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही.
मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना काय विचारलं?
या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना थेट प्रश्न विचारले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत… जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का?”
जरांगेंवर टेंडर्सवरून आरोप करणारे बारस्करच अडचणीत; मालमत्ता खरेदीत गैरव्यवहारांचा आरोप
पुढे त्यांनी म्हटलं, “तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही.” असे जरांगे म्हणाले आणि एक ऑडीओ क्लिप ऐकवली.
जरांगे पुरावे घेऊन हजर
आपल्यावरती जे सलग तीन वर्षापासून आरोप होत आहे. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होतोय, माझ्या विरोधात षडयंत्र होतंय. निवडणूकांच्या काळात, उपोषणाच्या, आंदोलनाच्या काळात षडयंत्र रचले जात आहे. याचे पुरावे मी आज देणार. माझ्यासोबत दुश्मनासारखे वागत आहेत. शिंदे साहेबांनी काल सांगितलं मी कोणाकडून पैशे घेतले नाहीत आणि कोणाला दिले नाहीत. असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी रेकॉर्डींग ऐकवली
कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमधील संभाषणात मनोज जरांगे यांच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख करत, त्यांना राजकीय प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. “भाजपा हा पक्षच मराठा द्रोही करतोय. त्याचा प्रभाव राहलाय नाही राहलाय तो होतोय. त्याला (मनोज जरांगेंना) भाजपातल्या मराठा पुढाऱ्यांनी उत्तरं देणं, संधी साधून बोलणं हे केलं पाहिजे,” असं संभाषणात म्हटलं आहे.
जरांगे हे शेती आणि कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर भूमिका मांडत असल्याने त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्याबाबतही चर्चा झाल्याचं ऐकू येतं. यासाठी अतुल यांच्यामार्फत उदयनराजे यांच्याशी बोलण्याचा, तसेच निरंजन डावखरे यांच्यासह काही व्यक्तींच्या भेटी घडवून आणल्याचा उल्लेख संभाषणात आहे.
धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार ; टीझरमधून समोर आला ललित प्रभाकरचा दमदार लूक
जरांगे यांच्या विरोधात बोलण्यास तयार असलेल्या व्यक्तींना पुढे आणून त्यांची प्रतिमा खराब करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही संभाषणात चर्चा आहे. “हे आपल्या हाताने करायचं नाही, दुसऱ्याच्या हाताने करुन घेऊ, अशी माणसे आपल्याकडे आहेत. या कामासाठी पार्टीचा फंड वापरायचा नसेल तर वैयक्तिक फंड वापरावा. त्याला गाडीचा खर्च द्या, मोर्चाचा खर्च द्या,” असं संभाषणात म्हटलं आहे. सोशल मीडियासाठी आवश्यक मजकूर तयार करण्याऐवजी स्वतःच कंटेंट तयार करण्याचाही उल्लेख आहे.
पुढे मराठवाड्यात जरांगे यांचा प्रभाव वाढत असल्याचा उल्लेख करत, “याला नाही आवरलं तर हा गिळून घेईल मराठवाड्यात तुम्हाला, मराठवाड्यातील लोकं त्याच्याविरोधात बोलायला तयार आहेत. त्यांना बोलतं करा,” असं म्हटलं आहे. जरांगे यांच्यावर विविध नेत्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप केले जात असताना, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतही संभाषणात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निरंजन डावखरे आणि दरेकर यांच्याशी काही व्यक्तींच्या भेटी घडवून आणल्याचा उल्लेखही या कथित रेकॉर्डिंगमध्ये आहे.
