तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागतो, आम्हाला नाही; मनोज जरांगेंनी मर्यादाच ओलांडली!

तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागतो, आम्हाला लागत नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मर्यादा ओलांडलीयं.

Manoj Ja

Manoj Ja

Maratha Reservation : तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागतो, आम्हाला लागत नाही, या शब्दांत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मंत्री शिरसाट यांच्यावर टीका करताना मर्यादा ओलांडलीयं. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनोज जरांगे चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळाले आहेत. ते अंतरवली सराटीत उपोषणस्थळावरुन पत्रकार परिषदे बोलत होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केलीयं.

6 वर्षांनी दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; हायकोर्टाच्या आदेशानंतर CBI तपास, नेमकं काय घडलं होतं?

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा आंदोलकांच्या वळांची किंमत एकनाथ शिंदेंना नाही. एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाटांकडून प्रमाणपत्र रद्द करुन घेतली आहेत. एकनाथ शिंदेंनी लवकरात लवकर शहाणं व्हावं, अन्यथा ते संपून जातील. मराठ्यांना संपवायची सरकारची भूमिका असून संभाजीनगरमध्ये दंगली घडवण्याचा डाव आहे. तुमची तळमळ तुमच्या नेत्यासाठी, पण माझी तळमळ माझ्या समाजासाठी आहे, तुम्हाला उरावर घ्यायला नेता लागत असेल, आम्हाला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज विजांसह मुसळधार पाऊस; ‘या’ 5 जिल्ह्यांना अलर्ट जारी

तसेच एकनाथ शिंदेंना मराठ्यांच्यात मारामाऱ्या लावायच्यात. देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ शकत नाही? हे मान्य करा. गोळ्या केवळ तुमच्याकडे नाही मराठ्यांच्या पोरांकडेही आहेत. एक जरी गोळी लागली तर मराठ्यांची पोरं नरडं फोडून खातील. एकनाथ शिंदेंवर माझा जीव पण मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करणं अमान्य 12 सप्टेंबरला निर्णय होणारच मुंबईत येणारच आहोत. सरकार रडक्या अवलादीचं आहे, मर्दासारखं खरं सांगण्याची यांच्यात हिम्मत नाही. एकवर्षभर विखेंनी घात केला. तुम्ही संयम सोडा आणि मराठ्यांचे मुडदे पाडा. तुमचं मतदान तर गेलंच राजकारणातून आता तुम्ही गेलेच, शिंदेंविषयी चांगलं बोललो तेव्हा मराठा समाज बरा गोड लागला आता तुमच्या राजकारणाला आम्ही कात्री लावणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Exit mobile version