Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षणाबाबत जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून टीकेची तोफ डागली जात आहे. काही दिवसांपूर्वीच हाके यांनी लग्नाबाबतचं विधान केलं. या विधानावर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) चांगलेच संतापले असून तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळीप्रमाणे समजतो, या शब्दांत जरांगेंनी हाकेंना प्रत्युत्तर दिलंय.
पंतप्रधान मोदींचा AI Video काँग्रेसला भोवला ! दिल्लीत भाजपकडून एफआयआर
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मी आतापर्यंत त्याच्यावर काही बोललो नाही, तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळी प्रमाणे समजतो. अजित पवारांचे दोन कार्यकर्ते धनंजय मुंडे, आणि छगन भुजबळ यांनी त्यांना हाताखाली धरलं आहे, त्यांना काही बोलता येत नाही, म्हणून ते यांच्या तोंडून त्यांची भाषा वधून घेत आहेत. त्यांचे विचार बीड जिल्ह्यात येऊन पाजाळ्याचे काम करू नका, त्या दोघांना बोलता येईना म्हणून, त्या दोघांनी तुम्हाला हाताखाली धरलं असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.
अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार, दोन राउंड फायर; ‘या’ टोळीने घेतली जबाबदारी
लक्ष्मण हाके यांच्या काही लक्षात येत नाही, गरीब धनगर समाज बांधवांच्या हे लक्षात आलेलं आहे. म्हणून धनगर लोक त्यांना जवळ करत नाही, मी त्यांच्यावर काहीच बोललो नव्हतो, त्याला देखील हेच कारण होतं, ते म्हणजे आम्हाला माहिती आहे, की यांचे गढूळ विचार आहेत. कुणाच्याही लेकीबाळीवर आम्ही आतापर्यंत बोललेलो नाही, कारण धनगराची लेक आहे, ती आमची पण लेक आहे. धनगर बांधवांच्या हे लक्षात आलेल आहे, की हे विनाकारण भांडण विकत घेत आहेत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते लक्ष्मण हाके…
मराठा समाज आता ओबीसी समाजात आला आहे. आता तुमच्यात आणि आमच्यात आंतरजातीय विवाह झाला पाहिजे. तुम्ही आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं तयार आहेत. आमच्या 11 पोरांसोबत मराठ्यांच्या पोरींचा विवाह जाहीर करा, असं लक्ष्मण हाके म्हणाले होते.
तुम्ही वैचारिक विरोध करत होता, आरक्षणाबद्दल बोलत होता, तोपर्यंत ठीक होतं. पंरतु आता तुम्ही आमच्या अस्मितेपर्यंत पोहोचला आहात, त्यामुळे तुम्ही कोणाच्या विचाराचे माणूस आहात? हे आम्हाला कळालं आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.