“जो मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला 2029 मध्ये निवडून द्यायचं नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange 2029 Election Warning; जरांगेंनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणासह शेतकरी प्रश्नांवरून सरकार आणि मराठा नेत्यांवर निशाणा साधला.

Manoj Jarange 2029 Election Warning

Manoj Jarange 2029 Election Warning

Manoj Jarange 2029 Election Warning:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायणगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणासह शेतकरी प्रश्नांवरून सरकार आणि मराठा नेत्यांवर निशाणा साधला. “जो नेता किंवा पक्ष मराठा समाजाच्या विरोधात जाईल, त्याला 2029 मध्ये निवडून द्यायचं नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने आता जागरूक होऊन राजकीय नेत्यांच्या भूमिकेचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Mohan Bhagwat : भारताला कमजोर व विभाजित करण्याचे प्रयत्न ; मोहन भागवतांचा मोठा दावा

मराठा समाजाला ज्या नेत्यांचा आधार वाटत होता, तेच समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मराठा नेत्यांनी सत्तेत असताना स्वतःची घरं भरली. मात्र समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, अशी टीका त्यांनी केली. “मराठा नेत्यांचा किती दिवस उदो उदो करणार? भानावर या,” असे म्हणत त्यांनी समाजाला राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

मराठा आरक्षणासाठी मदतीचा नंबर जाहीर करणार

मराठा-कुणबी नोंदी, एसईबीसी (SEBC) आरक्षण आणि प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. 22 तारखेला हा क्रमांक दिला जाणार असून, कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यास किंवा आरक्षणासंदर्भात काही अडचण असल्यास या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मराठा समाजाच्या इतर अडचणींसाठीही स्वतंत्र क्रमांक दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार! प्रताप सरनाईकांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

मराठा आरक्षणाबाबत सरकारने पाटोदा येथे तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यापैकी एक महिना संपला असून, आता दोन महिने शिल्लक असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच मी मराठ्यांनी ज्या दिवशी सांगेन त्या दिवशी मुंबईला निघायचं. असा स्पष्ट इशारा मनोज जरांगेंनी मराठ्यांना दिला.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी

दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाचाही मुद्दा उपस्थित केला. सध्या शेतकरी अडचणीत असून, त्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि कृषीतज्ज्ञांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली, तर सरकारकडून हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळवायचीच, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’ उदय सामंत यांचा जयकुमार गोरेंना टोला!

सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीवरही त्यांनी टीका केली. ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत अनेक दिवस चकरा माराव्या लागतात. त्यात पेट्रोल आणि जेवणाचा खर्च वजा केल्यास हातात किती पैसे उरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळावी, यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही जरांगे म्हणाले.

 

Exit mobile version