Download App

…तेव्हापासून फडणवीस मनातून उतरले, त्यांच्यामुळे मोदी सरकारचाही बट्ट्याबोळ; जरांगे आक्रमक

Manoj Jarange यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच त्यांनी 2023 ला च्या आंतरवालीतील आंदोलनावरील लाठीचार्जवरून फडणवीसांवर निशाणा साधला.

Manoj Jarange on Devendra Fadanvis for Mumbai Maratha Morcha : गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी 2023 ला झालेल्या आंतरवालीतील आंदोलनावरील लाठीचार्जवरून फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

आंतरवाली सराटी या ठिकाणी जेव्हा मारहाण झाली. त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. इतका प्राणघातक आणि क्रूर हल्ला आमच्या माय- माउलीवरती महाराष्ट्र मध्ये कधीच झाला नाही. माय माऊलींचे रक्त सांडताना आम्ही डोळ्याने बघितले. श्रीमंताची आई म्हणजे आई आणि आम्हा गरिबांची आई म्हणजे आई वाटत नाही. असा भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही. लहान लहान लेकरांवरती गोळ्या झाडल्या. गोळ्या संपल्यानंतर दांडक्याने मारहाण केली. अनेक माय माऊलींचे डोके फुटले, हा रक्त महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर घराच्या टेरेसवर टाका; मनिषा कायंदेंनी आंदोलकांना ठणकावलं

आजही तुम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी आल्यानंतरने अनेक म्हातारी लोक पलंगावरती दिसतील. यामध्ये कुणाचे गुडघे फुटलेत तर कुणाच्या शरीरामध्ये गोळ्या घुसल्या आहेत. लीलावतीच्या डॉक्टरांना देखील या गोळ्या निघाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस हे काय आमचे शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत वैरी देखील नाहीत, पण जेव्हापासून हल्ला केला तेव्हापासून ते आमच्या मनातून उतरले आहेत.

नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा होणार बंद; टपाल विभागाचे ‘हे’ नवे निर्देश पाहा…

आदिलशाहीच्या काळात देखील असा हल्ला झाला नसेल, पण अंतरवलीच्या किंकाळ्या ऐकला असता, तर तुम्ही बेशुद्ध पडला असता. पण आता नाटकं करायची नाहीत, सरकारने पुन्हा अशा भानगडीत पडायचे नाही. तुमच्यामुळे तुमचा (राज्य सरकारचा) कार्यक्रम होणार म्हणजे होणार. पण तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्ट्याबोळ होईल. तुम्ही आमच्या माय – माऊलींवरती टाकलात, आता काठी देखील लावायची नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात, विजय वडेट्टीवारांची मागणी

27 ऑगस्टच्या आधी अंमल बजावणी झाली, तर ठीक अन्यथा मी नंतर कोणत्याही मंत्र्याचे ऐकणार नाही. सगळ्याच पक्षातील नेत्यांना आवाहन की, लेकरांच्या भवितव्यासाठी मुंबईला चला. तसेच मुंबईला जाताना एकाही पोराच्या मध्ये पडायचे नाही. जर असं झाल्यास, तर राज्यातला आम्ही पानंद रस्ता सोडणार नाही. पोलिसांच्या बळावर मराठ्यांवरती अन्याय-अत्याचार करायचे बंद करा.

follow us