Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन नाशिकमध्ये (Nashik) करण्यात आले होते. या रॅलीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
या रॅलीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना पाणी पाजले पण मी त्याला वस्ताद भेटलो आहे. अशी टीका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.
या रॅलीमध्ये बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांचे ऐकत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना पाणी पाजले पण मी त्याला वस्ताद भेटलो आहे. सरकारला मराठा समाजाच्या वेदना आतापर्यंत लक्षात आल्या नाही. 2024 मध्ये सगळ्यांचे टांगे पलटी करायचे आहे. आता फक्त 29 तारखेपर्यंत वाट बघायची आहे.
सरकारला 2 महिन्यांचा अवधी दिला होता, मात्र काहीच हालचाल झाली नाही म्हणजे सरकारला आरक्षण द्यायचे नाही. भाजपवाले आरक्षणासाठी विरोध करत आहे. ते आता बैठकीला बोलावत आहे, हे याला बोलावतात, ते त्याला बोलावतात. यांना अंतरवालीचे नाव घेतले तरी टेन्शन येतं आहे आता. सरकारने न टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आणि इडब्लूएस आरक्षण काढले आणि म्हणता आमच्यामुळे ते आरक्षण गेले. असं या रॅलीत जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून पोलिसांनी मला कुटले आहे पण तुम्ही फडणवीस यांचं ऐकून मला मारले आणि आमची सत्ता आली मग काय होणार. आता देवेंद्र फडणवीस यांनी शहाणे व्हावे, मराठे एक आले तर इतिहास घडतो. मला काय त्रास आहे हे मी सांगत नाही पण समाजाचा त्रास नाही बघवत. आज मराठ्याच्या अधिकाऱ्यांना बढती पण मिळत नाही आणि यांचे खपाखप पुढे जातात. तुमचे हुशार आणि आमचे काय कॉपी करून पुढे गेले का? एकजूट तुटू नका देऊ ही माझी विनंती. समाजाने समाजाची लेकरं उघडी पडू देऊ नका असा आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
या रॅलीत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी जरांगे म्हणाले की, तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती सगळ्या दुनियेचे दलिंदर आहे. तो मला म्हणतोय 8 सीट निवडून दाखवो.
भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर
माझ्या नादी लागू नको, तुमच्या येवल्याचे नाव यावेळेस पवित्र होणार आहे. येवल्याला लागलेला डाग पुसला जाणार आहे. छगन भुजबळला जास्त किंमत द्यायची गरज नाही. अशी टीका जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर केली.