Download App

Maratha Reservation: फडणवीस एकटे पडलेत! निवडणुकांसाठी कागदपत्र तयार ठेवा; जरांगेंनी पेटवलं रान

मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : मराठा समाजाला माझं सांगणं आहे थोडा संयम ठेवा. आपल्याला सत्ताधाऱ्यांनी आरक्षण देण्याऐवजी याची भूमिका काय आणि त्याची भू्मिका काय अशी कामं लावली आहेत. (Manoj Jarange ) त्यामुळे आता आम्हाला आमची ताकत दाखवायची वेळ आली आहे. जर नाही लवकर निर्णय घेतला तर मराठे 2024 ला आपली ताकत दाखवतील असा इशाराही मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश!

सरकारमध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ते सर्व पुतळे आहेत. सत्ता फक्त देवेंद्र फडणवीस चालवतात. त्यामुळे कुणाला वाटत असेल की फक्त फडणवीसांना टार्गेट केल जातय तर त्याचं कारण सर्व सत्ताच ते चालवत आहेत. त्यामुले आरक्षण द्यायच की नाही हा निर्णय ते घेऊ शकतात. तसंच, माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे तुम्ही छगन भुजबळांच्या नादी लागून सत्ता घालवून बसतातल. तुम्ही लवकर लक्ष घाला आणि आरक्षणावर निर्णय घ्या असही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी राजकीय भाष्य टाळणं हे त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर बोललं तर ते त्यांच्या हिताचे आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार यांची भूमिका ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, अशी आहे. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील एकटे पडत चालले आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमीक जाहीर करावी असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.

follow us