Download App

Manoj Jarange : ‘मराठा आरक्षणाच्या आड आला तर सुट्ट़ी नाहीच’; जरांगे पाटलांचा इशारा कुणाला?

Image Credit: Letsupp

Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नवी मुंबईत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव न घेता त्यांना इशाराच दिला. ते म्हणतात माझ्या एकट्याच्याच मागं लागलाय. परवा दिवशी टोकायची गरज होती का. मी स्वतःहून कुणावर टीका करत नाही. मराठा आरक्षणाच्या आड आला की सुट्टी नाही असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.

Chhagan Bhujbal : ‘माझा पराभव सोडाच, भुजबळ किती जणांना पाडेल याचा हिशोब करा’; भुजबळांचा इशारा

मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरही जरांगे पाटलांनी भाष्य केलं. मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करा हेच सध्या सुरू आहे. हे लोक आपल्याला उचकवणार आहेत. त्यांचा डाव आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही, ही मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 24 डिसेंबरला मराठा आरक्षणाचा कायदा होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल. आम्हाला मुंबईत यायचं नाही. मात्र इथला समुद्र कसा आहे, घरे कशी आहेत. मंत्रालय कसं आहे हे आम्हाला बघायचं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

गेल्या 70 वर्षांपासून आपली मुलं आरक्षणाची वाट पाहत आहेत. आपण सुद्धा गनिमी कावा करतो. साताऱ्याला जायचं सांगून पुण्याला जातो. म्हणूनच आतापर्यंत 70 टक्के लढाई आपण जिंकली आहे. आपला विजय होईल याचा सुवर्णक्षण जवळ आला आहे. त्यामुळेच मी शांत आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजबांधवांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी राज्यभरातील मराठा समाजाकडून केली जात आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजबांधवांकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

Tags

follow us

वेब स्टोरीज