Download App

‘मार्चमध्ये आचारसंहिता’, अजित पवार कधीही किचकटच बोलतात; जरांगे पाटलांचा निशाणा

Manoj Jarange On Ajit Pawar : अजित पवार कधीही किचकटच बोलतात, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी ते अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत अजित पवार यांनी भाष्य करताच मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई

मनोज जरांगे म्हणाले, अजित पवार यांचे विधान कधीही असंच असतं. मागील काळात, पुढील काळात पाहा तुम्ही ते धोरणाबाहेरचेच विधाने करत असतात. अजित पवार कधीच गोरगरीब अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजून बोललेले नाहीत. कधीही किचकटच बोललेले आहेत. कुठंही गोंधळ होईल असंच ते बोललेले आहेत. कधीच समाधानकारक बोललेले नाहीत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करुन आम्ही लावतो आचारसंहिता, असं ते कधीच म्हणणार नाहीत किंवा पुढं थोडं ढकलतो असंही ते नाही म्हणत. अजित पवार कधीही उलट कुटानेच करुन ठेवणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी निशाणा साधला आहे.

‘आमचं सरकार आल्यावर ईडी, सीबीआयचं..,’; उद्धव ठाकरेंची अधिकाऱ्यांनाही तंबी…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर भाकीत केलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं अजित पवार बोलले आहेत. तर दुसरीकडे अंतरवली सराटीतून मनोज जरांगे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पवारांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला इशारा

आरोपांवर मनोज जरांगेंचं थेट भाष्य..
सरकारने मला बदनाम करायचं ठरवलं आहे. रात्री कळालं मला सरकारने माझ्या बदनामीसाठी काय लोकं सापडून आणले आहेत. मला माहित नव्हतं तोवर काही नाही बोललो मी जास्त. बदनाम करणाऱ्यांबद्दलचा इतिहास मला माहित झाला आहे, मला बदनाम करणाऱ्यांचा इतिहास माझ्या तोंडाने सांगण्यासारखा नाही, असा टोमणा मनोज जरांगे पाटलांनी आरोप करणाऱ्यांना मारला आहे.

follow us