मनोज जरांगे शब्दावर ठाम! उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय तपासणीला नकार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीत 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडून तपासण्यासाठी विनवणी करण्यात आली मात्र, जरांगे पाटलांनी तपासणी करण्यासही नकार दिला आहे.
वरिष्ठ समजून घेतल्याचे दाखवायचे, पण निर्णयावर येत नव्हते : अजितदादांचे लक्ष्य पुन्हा शरद पवार!
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर सरकारने तत्काळ कायदा पारित करण्याची प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यासोबतच सगेसोयऱ्यांसदर्भातही सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याचं म्हणत सगेसोयऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करुन अध्यादेशानूसार कायदा पारित करा, अन्यथा पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता.
मनोज जरांगे यांनी केलेल्या घोषणेनंतर 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानंतर आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानूसार त्यांची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर आले होते. मात्र, मनोज जरांगे यांनी तपासणीला नकार दिला आहे, त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती डॉ. दौडके यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच CAA ची अंमलबजावणी होणार! अमित शहांची सर्वात मोठी घोषणा
मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच अंतरवली ते सराटीपर्यंत पदयात्रा काढली होती. जालना ते मुंबईपर्यंत अशी ही पदयात्रा होती. या पदयात्रेत राज्यभरातील मराठा बांधवांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. अहमदनगर, पुणे, मुंबई या मार्गावरुन ही पदयात्रा मुंबईत धडकली. अखेर मुंबईतील वाशी परिसरात पदयात्रा दाखल होताच राज्य सरकारकडून अध्यादेशाबाबत कारवाई सुरु करण्यात आली. अखेर राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाचं अधिवेशनात कायद्यात रुपांतर करण्यातं यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=uzlBFq-Ex6I%E0%A5%8B
दरम्यान, सध्या तरी मनोज जरांगे यांनी अद्याप उपचार घेतलेले नसून उद्या उपोषणाचा तिसरा दिवस असणार आहे. आंदोलनाच्या पुढील काळात मनोज जरांगे वैद्यकीय उपचार घेतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.