वरिष्ठ समजून घेतल्याचे दाखवायचे, पण निर्णयावर येत नव्हते : अजितदादांचे लक्ष्य पुन्हा शरद पवार!
पुणे : आज 50-52 आमदार पाठिंबा देतात, याचा अर्थ त्यांच्या मनात खदखदत होती, त्यांचेही विचार होते. पण वरिष्ठ समजून घेत नव्हते, समजून घेतल्याचे दाखवायचे पण निर्णयावर येत नव्हते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागली, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस युवा मेळाव्यात बोलत होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar once again criticized NCP (Sharad Chandra Pawar) party president Sharad Pawar.)
यावेळी अजित पवार म्हणाले, बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास करता आला पाहिजे म्हणून भूमिका स्वीकारली. आज ५०-५२ आमदार पाठिंबा देतात, याचा अर्थ त्यांच्याही मनात खदखदत होती, त्यांचेही विचार होते. पण वरिष्ठ समजून घेत नव्हते, समजून घेतल्याचे दाखवायचे पण निर्णयावर येत नव्हते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागली. त्यातून कुणाचा अनादर करण्याचा, कमीपणा व्हावा अशी भावना कुणाचीही नाही. 30-32 वर्षे काम करताना प्रशासनावर पकड आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची जाण आहे. निर्णय धाडसाने कसे घ्यावेत याची आम्हाला माहिती आहे. कोणताही घटक वंचित राहता कामा नये याची माहिती आहे.
सुनील देवधरांची लोकसभेसाठी जोरदार तयारी : रविवारी नमो बाईक रॅलीची आयोजन
जगात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यांना व्हिजन आहे, 18 तास काम करतात. अनेक विमानतळे झाली, राष्ट्रीय हायवे, ब्रीज, टनेल झाली, बंदरे झाली, पाण्याचे प्रश्न सुटत आहे. 80 कोटी जनतेला मोफत अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे. परकीय गुंतवणुकीसाठी आपलं एक भक्कम स्थान त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे ते मान्य करायला हवे, त्यांच्या व्हीजनचा फायदा महाराष्ट्राला देशाला करून घेतला पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले.
“त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणून…” : निखिल वागळे यांना प्रत्युत्तर देत पुणे पोलिसांचे पाच गंभीर प्रतिआरोप
सोशल मीडियावर कोणी विनाकारण टार्गेट करत असेल तर तातडीने उत्तर द्या :
आजच्या काळात सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपल्याला खूप जागरूक राहावे लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्याचे तातडीने खंडन करा. वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही, त्यातून वाद निर्माण होणार नाही. सहिष्णुतेच्या माध्यमाने आपण कसे उत्तर देऊ शकतो, हे दाखवून द्या, असे सल्लेदेखील अजित पवार यांनी तरुणांना दिले.