Manoj Jarange Patil on Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाला अद्यापही पूर्णपणे यश लाभलेलं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं विधान केलं होतं. त्यावर आता जरांगे पाटलांनी भाष्य केलं.
Video: मराठा आंदोलकांचा शरद पवारांना थेट प्रश्न? फक्त पाठिंबा नको भूमिका सांगा? पाहा व्हिडिओ
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांनी आरक्षणाची गरज नाही असे म्हणू नये. कायम आपले विचार जनतेवर लादू नये, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांनी आरक्षणाची गरज नाही असे म्हणू नये. जे त्यांना वैभव मिळाले गोरगरिब जनतेच्या, मराठ्यांच्या जीवावर मिळाले आहे. या श्रीमंतांना आणि एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही, असा टोला जरांगेंनी लगावला.
पुढं ते म्हणाले, राज ठाकरेंनी या गोरगरिब जनतेची भावना फक्त एकदा जाणून घ्यावी आणि मग तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे की नाही, हे ठरवा, असं जरांगे म्हणाले.
कर्जबाजारी पाकिस्तान! सोळा वर्षात 11 पटीने वाढलं कर्ज; आकडा ऐकून बसेल धक्का
जरांगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना विचारा त्यांना आरक्षणाची गरज आहे का, ती जर नाही म्हणाली तर मग तुमचं मत व्यक्त करा. प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. तुमचे विचार लादू नका, असं जरांगे म्हणाले.
राज ठाकरेंच्या गाड्यांवर सुपारी फेकल्यानंतर दंगलीची भीतीही निर्माण झाली होती. त्यावर मनोज जरंगे म्हणाले, राज्यात कुठंही मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. कुणालाही अडवू नका. कुणाला जाब विचारू नका. विनाकारण गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन त्यांनी मराठा समाजबांधवांना केलं.