Download App

शिंदे सरकारच्या अडचणीत होणार वाढ? 127 मतदारसंघात मनोज जरांगेंचे सर्व्हे पूर्ण

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024 ) उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीत तर आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसापूर्वी केली होती तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी 127 जागांवर पहिला सर्व करण्यात आला आहे. याबाबत जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे.

याच बरोबर विधानसभा निवडणुकीत ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची देखील त्यांनी घोषणा केली आहे तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार उभे करायचे की पक्ष काढून उमेदवार उभे करायचे याचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणासाठी मी सरकारला वेळ दिलेला नाहीतर तर सरकारने वेळ घेतला आहे. मी यापूर्वी देखील सांगितले होते की, आम्ही विधानसभेची तयारी करत आहे. माझा आणि माझ्या समाजाचा राजकारणात येण्याचा कोणताही उद्देश नाही मात्र सरकारकडून आम्हाला राजकारणात ढकलण्यात येत आहे.

आम्ही आतापर्यंत 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही मतदारसंघात सर्व्हे करत आहे, आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही पाहिजे. इतर समाजानेही आमच्या सोबत आले पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आतापर्यंत 127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला असून लवकरच आणखी काही मतदारसंघात दुसरा सर्व्हे करणार आहे. मी स्वतः सर्व मतदारसंघात जाणार आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मराठा, मुस्लिम आणि दलित यांची मोट बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच 6 जुलैपासून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

असा असेल शांतता जनजागृती रॅली कार्यक्रम

हिंगोली : 6 जुलै

परभणी : 7 जुलै

नांदेड : 8 जुलै

लातूर : 9 जुलै

धाराशिव : 10 जुलै

बीड : 11 जुलै

जालना : 12 जुलै

1.50 लाखांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय 40 हजारांचा डिस्काउंट

संभाजीनगर : 13 जुलै

तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील जरांगे पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. 60 टक्के जाती ओबीसी आहे आमचं बहुमत आहे. जर आम्ही मुस्लिम आणि दलित यांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के जातो. आम्ही 199 मतदारसंघात सर्व्हे केले आहे असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज