राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

Many NCP and Congress MLAs are in touch : 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या (Lok Sabha and Vidhan Sabha) तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यात नेतृत्वासाठीचा छुपा संघर्ष […]

Untitled Design   2023 04 13T110901.031

Untitled Design 2023 04 13T110901.031

Many NCP and Congress MLAs are in touch : 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या (Lok Sabha and Vidhan Sabha) तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यात नेतृत्वासाठीचा छुपा संघर्ष असल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार बाद होणार असून अजित पवारही भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील काही आमदार भाजपात येणार असल्याचे संकेत दिले.

राजकारणता कधी काय घडेले, हे सांगता येत नाही. राजकीय नेत्याच्या बदलत्या भूमिकेमुळं रात्रीतून सत्तांतर झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आलं आणि राज्यात सत्तांतर झालं. तेव्हापासून राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. कोर्टाचा निकाल नेमका काय लागतो याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या विरूध्द लागला तर भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपचा प्लॅन बी साठी प्रयत्न सूर असल्याचं बोलल्या जातं.

BBC INdia : ईडीने विदेशी निधीतील अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल केला

त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 15 आमदारांना घेऊन बाहेर पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. यावेळी संपर्कात असलेले आमदार भाजपमध्ये कधी येणार याची योग्य वेळही फडणवीसांनी सांगितली. फडणवीस हे मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुमत चाचणीला कॉंग्रेसचे सतरा आमदार हे उपस्थित नव्हते, त्यावरून अनेक तर्कवितर्क सुरू होते. दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मधील काही आमदार भाजपमध्ये येणार आहेत का, तुमच्या संपर्कात काही आमदार आहेत का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितलं की, असं आहे की, विरोधी पक्षाचे लोक हे संपर्कात नेहमीच असतात. कारण, शेवटी मागच्या वर्षात बघितलं तर सत्तारूढ पक्षात काम करत असतांना आपण संबंध निर्माण करतो. त्या संबंधामुळं आणि एकंदरित आपल्या आत्मविश्वासामुळं अनेक लोक सोबत येतात. गेल्या पाच वर्षात अनेक लोक भाजपसोबत आहे आहेत. आताही संपर्कात अनेक लोक आहेत.पण, त्यातील किती लोक भाजपमध्ये येतील हे आजच पक्क असं सांगतात येत नाही. आमदार आमच्या संपर्कात असतातच, असं फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले, आम्हा राजकारण्यांची गरज ही कधीच संपत नसते. आम्ही आमचं सरकार चालवण्यासाठी सक्षम आहोत. पण आम्ही शेवटपर्यंत पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन होण्याची अजून वेळ यायची आहे. ही वेळ निवडणुकीच्या तोडांवर आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

 

 

Exit mobile version