Maratha Andolan : जालन्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद अजूनही उमटत आहेत. राज्य सरकारवर विरोधी पक्षाचे नेते तुटून पडले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी एकच चूक केलेली नाही तर त्यांनीच मराठा आरक्षण (Maratha Andolan) घालवलं. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं हे त्यांनी मान्य केलं. शरद पवारांना माझा हाच प्रश्न होता. कटकारस्थान करून ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आता तुमची जबाबदारी नव्हती का? ज्यावेळी मराठा आरक्षण न्यायालयात होतं. सुनावणी सुरू होती. त्यावेळी मराठा समाजाची बाजू मांडण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं. मग पवार साहेबांनी मोठे वकिल देण्यात ठाकरेंना बाध्य का केले नाही, असा सवाल बावनकुळे यांनी विचारला.
Maratha Reservation : जालना लाठीचार्ज! ‘हे’ प्रकरण घडवलं गेलं… थोरातांनी व्यक्त केला संशय
आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर (Maratha Andolan) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं.
फडणवीस यांनी कशाबद्दल क्षमा मागितली हे तपासून घेतलं का?, त्यांच्या विभागांतर्गत पोलिसांनी (Maratha Andolan) जी चूक केली आहे त्याबद्दल खात्याचे मंत्री आमच्या पोलिसांनी चूक केली मी क्षमा मागतो. यात त्यांचा मोठेपणाच आहे ना. देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठेपणा आहे त्यामुळेच त्यांनी या घटनेबद्दल क्षमा मागितली. हे त्यांचं मोठेपणच आहे. याला दिलदारपणा लागतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची चूक आहे असे म्हणणारे मुर्खाच्या नंदनवनात आहेत असे मला वाटते.
परवा वडेट्टीवार म्हणाले होते. की ओबीसीतून मराठा आरक्षण (Maratha Andolan) देण्यास माझे समर्थन आहे. आणि मी सांगितलं होतं की कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून कोणत्याही समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. व्हीजेएनटी, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणे काही योग्य नाही. त्याऐवजी फडणवीस सरकारने जो कायदा केला होता. न्यायालयात तो कायदा टिकवला.
Kiran Mane: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “मराठा समाजाला आरक्षण…”
मराठा समाजाचे संपूर्ण सर्वेक्षण (Maratha Andolan) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलं होतं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून पूर्ण अभ्यास केला. त्याकरता जी पद्धती अवलंबली गेली तीच आता अवलंबली गेली पाहिजे. ज्या सवलती त्या काळात लागू केल्या होत्या त्या कायम राहिल्या पाहिजेत. मराठा समाजाची जी मागणी आहे ती सरकारने तातडीने सोडवावी असे माझे मत आहे. ओबीसीतून आरक्षण द्या हे जे सध्या सुरू आहे ते म्हणजे ओबीसी समाजाला दुखावणे आहे असे मला वाटते. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. भाजप समाजाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.