Download App

Maratha Reservation बद्दल सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील; ‘त्या’ व्हिडीओवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण…

CM Eknath Shinde On Viral Video : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागं घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये झालेल्या संभाषणावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका सुरु झाली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करुन त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मराठा आरक्षणाबद्दल सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील आहे. त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

Marine Department Exam : परीक्षा केंद्रात नाहीतर हॉटेलमध्ये बसून दिली परीक्षा; 22 जणांवर गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाविषयी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेपूर्वीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवाद सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने संपादित करुन फिरवला आहे. हे अत्यंत खोडसाळपणाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे.

रक्षा खडसे vs एकनाथ खडसे! सुनेसमोर सासऱ्याचं आव्हानं; खडसेंकडून रावेर लोकसभा लढण्याचे संकेत

शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे.

आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

follow us