Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.या घटनेवरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. यातच हे प्रकरण घडलं कसं? याचा शोध घेणं गरजेचं आहे. याबाबतीमध्ये देण्यात आलेल्या सूचना या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या असल्याचा संशय जनतेमध्ये आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
Maratha Reservation : बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा संदर्भ देत ‘वंचित’चा मराठा आरक्षणाला पाठिंबा
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
थोरात यांनी जालना येथे मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) झालेल्या हल्ल्याचा निषेध करत सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मात्र या ठिकाणी उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. सदर घटना अत्यंत दुर्दवी आहे. लोकशाही पद्धतीने सुरु असलेल्या या आंदोलनावर अशा प्रकारे हल्ला करणे हि चुकीची घटना आहे. आरक्षणासंदर्भात जी एक कमिटी असते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमची देखील एक समिती होती. याची आठ दिवस पंधरा दिवसांनी आम्ही वकीलांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याबाबत जाणून घेत असायचो.
Kiran Mane: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “मराठा समाजाला आरक्षण…”
मात्र या नव्याने अस्तित्वात आलेल्या या सरकारमध्ये अशा काही कमिटीच्या बैठका झाल्यात कि नाही यावरच थोरात यांनी संशय व्यक्त केला. पुढे बोलताना थोरात म्हणाले, संयमाच्या काही सीमा असतात. मराठा समाजाच्या तरुणांनी खूप काळ संयम धरला आहे. ते शांततेच्या मार्गाने त्याठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) करत होते. मात्र जेव्हा एवढी मोठी घटना घडली तेव्हा प्रशासन बैठक घेत आहे. गेल्या दीड वर्षात तुम्हाला हे काही आठवलं नाही. अत्यंत निषेधार्थ घटना या सरकारकडून झाली आहे.
इंडिया बैठकीवर काही परिणाम नाही
आमची इंडिया आघाडीची बैठक नुकतीच पार पडली.देशातील प्रत्येकाना याबाबत माहिती देखील आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडवून आमच्या बैठकीवर याचा काही परिणाम होईल असे काही नाही आहे. हे घडवलं गेलं. पोलिसांवर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं मात्र याचा मुख्यसूत्रधार कोण हे शोधलं पाहिजे असे यावेळी थोरात म्हणाले.