Manoj Jarange On Chagan Bhujbal : आमच्यात येऊ नका म्हणतोयं मग कुठं जातो रं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal)यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेतून मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवरुन छगन भुजबळांना चांगलचं धारेवर धरलं आहे.
राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक : ‘इंडिया’ आघाडी प्रवेशासाठी आंबेडकरांची साखर पेरणी
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आमच्यात येऊ नका म्हणतोयं, मग कुठं जातो रं’ तुमच्यात अन् आमच्यात येऊ नको म्हणतो, आरक्षणं खातो, ओबीसीचं खातोस, ओबीसी आरक्षणात ज्यांचा फायदा झाला त्यांचाच झाला. ओबीसीत असलेल्या इतर गोरगरीब जातींचा अजूनही फायदा झालेला नाही. एकटाच वरबाडून खातोयं तरी म्हणतोयं कमी पडलं आहे, आमचा टक्का कमी झाला तर मग आम्ही काय करावं या शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘बायजू’च्या बुडणाऱ्या जाहजाला आणखी एक छिद्र; 9 हजार कोटींच्या प्रकरणात ‘ईडी’ वक्रदृष्टी
तसेच राज्यात ओबीसी-मराठा वाद लावून दंगली कराव्यात असा त्यांचा उद्देश आहे, मला माहित आहे 70 वर्षांपासून आम्ही आरक्षणाची वाट पाहिली. आता विजयाचा क्षण आम्हाला वाया नाही घालवायचा. एवढंच डोक्यात आलंयं म्हणून संयम धरलायं कारण आता कोणाचीच सुट्टी नाही. काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठे आरक्षण मिळवणारच तु कितीही विरोध कर, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागं हटायचं नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
ST Bus Accident : तीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने दोन कारसह पाच दुचाकी उडवल्या; पुण्यातील घटना
अनुभवी माणसापेक्षा रानात काम केलेला बरा :
मराठे आता एक झाले आहेत. किती सभा घ्यायच्या असतील तेवढ्याही घ्या. ओबीसीमधील अर्धे नेते फुटलेत. इतक्या वर्षाचा अनुभव असलेला माणूस असा वागतोच कसा मी रानात काम केलेला बरा आहे, म्हातारपणात पचत नाही. सात ते आठ वेळा जावंच लागतं कारण लोकांचं खाल्ल तर पचन कसं, त्यांनी शांत रहावं नाहीतर कायम बाथरुममध्येच रहावं लागण, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे राज्यभर सभा घेत राज्य सरकारसह छगन भुजबळांवर टीका करीत आहेत. तर दुसरीकडे सरकारला त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने आरक्षण दिलं नाहीतर 24 डिसेंबरनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.