Download App

‘मराठ्यांना ओबीसीत घ्या मग जातिनिहाय जनगणना करा’; जरांगेंची आजही नवीन मागणी

Image Credit: Letsupp

Maratha Reservation : मराठा समाजाला आधी ओबीसीत घ्या मगच जातिनिहाय जनगणना करा, अशी मागणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केली आहे. मराठा समाजाकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिलायं. तर शिंदे समितीकडून जुन्या नोंदीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलायं. दरम्यान, फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितलं आहे. त्यानंतर आता मनोज जरांगेंनी आजही नवीन मागणी केली आहे.

राणा दाम्पत्याला कोर्टाचा मोठा धक्का, हनुमान चालिसाप्रकरणी याचिका फेटाळली

मनोज जरांगे पाटील म्हणाले, विधी मंडळाचं उद्या अधिवेशन संपणार आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. 24 डिसेंबरनंतर सरकारला वेळ वाढवून मिळणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास पुढील दिशा ठरणार आहे. त्यानंतर आम्ही सरकारचे ऐकणार नसून आरक्षणाचा लढा सुरुच ठेवणार आहोत. लेकरांना न्याय द्यायचा आहे, मोठं करण्यासाठी लढायचं आहे, त्यासाठी आम्ही मराठा आरक्षणासाठी लढणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे.

तसेच आई ओबीसी असेल तर ती जात मुलांना लावा. मी केलेली मागणी घटनाबाह्य नाही. सरकारने आमचा अंत पाहू नये. विदर्भ असो किंवा मराठवाडा सर्व मराठा एकच आहेत. आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहोत. सरकारने मराठा समाजासोबत खेळ खेळू नये. माध्यमं म्हणचे मराठ्यांचे पवित्र व्यासपीठ आहे. आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेले तर कोर्टात टिकणार नाही. शिंदे समितीतील काही अधिकारी नीट काम करत नसल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

विशेष अधिवेशन बोलवून फसवू नका :
विधी मंडळाचं उद्या अधिवेशन संपणार आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. 24 डिसेंबरनंतर सरकारला वेळ वाढवून मिळणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे सरकारने आत्ताच अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, भुजबळांचे ऐकून आमच्यावर अन्याय करु नका. विशेष अधिवेशन बोलावून फसवणूक करु नका, असं जरांगे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणामुळे इतर कुणालाही धक्का लागणार नाही. आधी मराठ्यांना आरक्षण द्या नंतर जनगणना करा. आम्हाला ओबीसीत घ्या आणि मग जनगणना करा. जातीपेक्षा नेत्यांना मोठे मानायचे नाही असं मराठ्यांनी ठरवले आहे. राज्यातील सर्व मराठा समाज एकत्र असल्याचं मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज