Download App

फडणवीस ‘हा’ गैरसमज करुन घेऊन मोठी चूक करतोयं; मनोज जरांगेंचं मोठं विधान

मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.

Manoj Jarange News : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला (BJP) फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) मोठी चूक करत असल्याचं मोठं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलंय. लेटस्अप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी मनोज जरांगे यांची लेटस्अप चर्चा या कार्यक्रमात विशेष मुलाखत घेतलीयं. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण देवेंद्र फडवीसचाच विरोध असून त्याच्यासारखा खुनशी राजकारणात कोणीही नसला पाहिजे. आमची राज्यातील 288 मतदारसंघात निवडणूक लढायची तयारी आहे, अनेक मतदारसंघात आमचे उमेदवार लाखोंनी मते घेणारे आहेत. मराठा समाजाशिवाय एकही जागा निघू शकत नाही. मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधकांचीच मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

अनिल देशमुखांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात; पवारांकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर

तसेच देवेंद्र फडणवीस हा असा गैरसमज करुन घेत आहे. ही फडणवीस त्याच्या आयुष्यातील मोठी चूक करुन घेत असून हा गैरसमज पसरवायला त्याने सडक्या टोळ्या लावल्या आहेत. राज्यात मराठा-मुस्लिम-दलित एकत्र आहेत. त्यामुळे कोणाचीच जागा निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. निवडणुकीत याआधी काही लोकांनी प्रयोग केलेले आहेत, हे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवारांसोबत एखाद्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे मग त्यांचं मतदान आपोआप ते खातील असं त्यांच्या डोक्यात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आरक्षणावर मोदी-शाहांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही…
मराठा आरक्षणाबाबत मंत्री अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं, असं आमच्याकडून माध्यमांसमोर सांगण्यात येत होतं. भाजप आमचे वैरी नाहीत, आधी मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण दिलं होतं, त्यानंतर राज्यात भाजपचे 106 आमदार निवडून आले. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही लक्ष घाला, मोदी शाहांच्या शेकडो सभा झाल्या पण त्यांनी तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

विधानसभेत रंगणार गुरू शिष्याची लढाई, मुंब्रात नजीब मुल्ला देणार जितेंद्र आव्हाडांना आव्हान

follow us