Download App

डेडलाईन विधानावर जरांगेंचा युटर्न; म्हणाले, ‘बदलण्याचा प्रश्नच..,’

Manaoj Jarange Patil : मराठा आरक्षाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं आहे. आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने उपोषणे मोर्चे काढण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manaoj Jarange Patil) यांचं उपोषण सुरु असतानाच बीडमध्ये जाळपोळच्या घटना घडून आल्या. त्यानंतर राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. उपोषणानंतर मनोज जरांगे यांनी राज्य पिंजून काढलं आहे. राज्यभर जाहीर सभेतून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागत आहेत. याचदरम्यान बोलताना मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या डेडलाईनवरुन केलेल्या विधानावर युटर्न घेतल्याचं दिसून आलं आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना भुलविणाऱ्या UPSC कोचिंग इस्टिट्यूट्सचा बाजार उठणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवस लेट पण आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाहीच, असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या विधानावर चर्चा सुरु झाली होती. अखेर मनोज जरांगे पाटलांनी या चर्चेला पूर्णविराम देऊन टाकला आहे. मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही शब्दश: अर्थ नका घेऊ.

Animal नंतर अनिल कपूर पुन्हा सज्ज! कॅप्टन राकेश जयसिंग म्हणून ‘या’ चित्रपटात झळकणार

मराठा समाजाचा विश्वास संपादन करताना मला असं सांगायचं होतं की, विश्वासघात नाही झाला पाहिजे. हे मला सांगायचं होतं मला आधी समाज महत्वाचा आहे. दोन दिवस लेट याचा अर्थ म्हणजे काय 24 डिसेंबर नंतर नाही मग तर यांना सुट्टीच नाही. डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच येत नाही, मरावाड्यातला बोलण्याचा भाग आहे, दोन दिवस लेट पण आपल्यातले संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत, या शब्दांत मनोज जरांगे यांनी युटर्न घेतला आहे.

Jitendra Awhad : ‘दादा माझं सोडा, तुमची ढेरी दाखवतो’; फोटो ट्विट करत आव्हाडांचा खोचक टोला

मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा दौरा करणार आहे. 1 डिसेंबर पासून दौऱ्याची सुरूवात झाली आहे. जालना पासून दौऱ्याला सुरूवात झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, मलकापूर, खामगाव, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड जिल्ह्यात सभा पार पडली. आरक्षण असलेल्या मराठा आणि आरक्षण नसलेयल्या मराठ्यांनी आता आरक्षणासाठी एकत्र यावं, असं आवाहन जरांगेंनी सभेतून केलं.

दरम्यान, सध्या राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. आत्तापर्यंत 30 लाखांपेक्षा अधिक नोंदी सापडल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.

Tags

follow us