Maratha Reservation : मनोज जरांगेंना एक महिना मुख्यमंत्री करा; ‘नायक’च्या धर्तीवर रिक्षाचालकाची अजब मागणी

Maratha Reservation : मनोज जरांगेंना एक महिना मुख्यमंत्री करा; ‘नायक’च्या धर्तीवर रिक्षाचालकाची अजब मागणी

Maratha Reservation: महाराष्ट्रात (Maharashtra)मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासाठी इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण दिलं तर ओबीसींच्या (OBC)विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. मराठा आरक्षण न दिल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. अशातच नायक चित्रपटाच्या (Nayak movie)धर्तीवर रिक्षाचालकाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister)करण्याची मागणी केली आहे.

कबड्डीत वादाची ठिणगी! अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरेंवर शिवसेना खासदाराचे गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना महिनाभरासाठी मुख्यमंत्री करा, अशी मागणी राज्यातील रिक्षाचालकांनी केली आहे. नायक चित्रपटाच्या धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्यासाठी मुख्यमंत्री करावा अशी मागणी केली.

मलिकांची भूमिका तटस्थच! पण हिवाळी अधिवेशन गाजवणार

रिक्षाचालक विशाल नांदरकर (38) याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून स्टॅम्प पेपरवर आपली याचिका दाखल केली आहे. उद्या 7 डिसेंबरपासून नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधीच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली याचिका सादर केली आहे. त्यावर उपाय अतिशय सोपा असल्याचे नांदरकर यांनी सांगितले आहे.

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची सर्वस्वी जबाबदारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सोपवा, एका महिनाभरासाठी दुसरे मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. आपल्या युक्तिवादावर ऑटोचालक म्हणाले की, राज्यात दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) असू शकतात, तर दोन मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

रिक्षाचालक म्हणाले की, शिंदे यांच्यावर आधीच राज्याच्या इतर कर्तव्यांचा अधिक भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी फारसा वेळ नाही, त्यामुळे मनोज जरांगे हे या प्रश्नाकडं लक्ष घालतील, असंही त्यांनी सांगितलं.

मराठा, धनगर, मुस्लिम आणि इतर कोणत्याही पात्र समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर चौकटीत सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांशी सल्लामसलत करुन जरांगे पाटील यांना विशेष अधिकार देऊन त्यांची नियुक्ती करावी, अशी आपली मागणी आहे. महिनाभरासाठी दुसरा मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी रिक्षाचालक नांदरकर यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube