मलिकांची भूमिका तटस्थच! पण हिवाळी अधिवेशन गाजवणार
मुंबई : उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of the Legislature) सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही सभागृहात दिसणार आहेत. सध्या मलिक वैद्यकीय कारणांमुळे अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मलिक नागपूरला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना भुलविणाऱ्या UPSC कोचिंग इस्टिट्यूट्सचा बाजार उठणार
उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून आजपासून सर्वच पक्षांचे नेते आणि आमदार नागपुरात दाखल होताना दिसत आहेत. राज्यात गाजत असलेल्या विविध मुद्द्यांचा या अधिवेशनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईडीने अटक केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले मलिक सध्या जामिनावर असून अनेक दिवसांनी सभागृहात दिसणार आहेत.
‘…आता खासदार होण्यासाठी दलित होतात’; कन्हैय्या कुमारांचा रोख कुणाकडे?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट नवाब मलिक यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही गटांच्या नेत्यांनी मलिक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, मलिक यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणत्या गटात प्रवेश करणार याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, ते उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मलिक हे शरद पवारांच्या बाजूने बसणार की अजित पवार गटात बसणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. हीच भूमिका ते आगामी काळात कायम ठेवतात, का हेच पाहणं गरजेच आहे.
दरम्यान, यंदा अधिवेश केवळ दहा दिवसांचे होत असून यामुळं विरोधकांची नारजाी आहे. विदर्भातील अधिवेशन किमान सहा आठवडे सुरू ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.मात्र, यंदा ७ ते २० डिसेंबरपर्यंतच चालणाऱ्या अधिवेशनात फक्त दिवस कामकाज चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, परंपरेप्रमाणे विरोधकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर मुख्यमंत्र्यासंह सर्व प्रमुख मंत्री चहापान कार्यक्रमास उपस्थित आहेत. दरम्यान, या कार्यक्रमानंतर मंत्री मंडळ बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.