Download App

‘तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय’; मनोज जरांगेंचं भुजबळांना थेट उत्तर

तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार छगन भुजबळ यांना थेट उत्तर दिलंय.

Manoj Jarange On Chagan Bhujbal : तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना (Chagan Bhujbal) दिलंय. सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान न मिळाल्याने मनोज जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळाल्याची खंत भुजबळांनी व्यक्त केलीयं. त्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी भुजबळांना थेट उत्तर दिलंय. ते अंतरवलीत बोलत होते.

कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, शिवतारे संतापले

मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळांना मंत्रिपद हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते प्यूर एडपट असून काहीही बरळतात. तू डोनाल्ड ट्रम्प यांची जागा घे मला काय करायचंय, मला राजकारणात पडायचं नाही, त्यांच्या मंत्रिपदाबाबत आम्ही बोलत नाहीत. हा राजकीय विषय आहे. मराठा आरक्षणाविरोधात जो काही बोलणार त्याला सोडणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिलायं.

सरकारने छगन भुजबळांचं काय केलं काय नाही ते मला माहिती नाही, तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे, त्यांना काय दिलंय हे माहिती नाही. त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. मला त्यात पडायचं नाही . हा विषय आरक्षणाचा नाही, मला काही बोलण्याची काही गरज नाही,. आरक्षणात तो बोलला तर मी सोडणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

“..तर मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी CM होऊ शकतो” ; फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य

तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख अंतरवलीतून जाहीर करणार असून, राज्यातील मराठा बांधवांनी आमरण उपोषणाला बसायचं असेल तर त्यांनी अंतरवलीत यावं, इथं येऊन उपोषण केलंच पाहिजे असं नाही, कोणीही उपोषणाला बसलं नाही तरीही मी बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय.

अधिवेशनात आरक्षणाची मागणी निकाली काढा…
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने निकाली काढावा, आम्ही आधीपासूनच ओबीसीत आहोत तीन गॅझेट लागू करावेत. सर्व केसेस मागे घ्या, शिंदे समितीलाही काम करण्याचे आदेश द्यावेत, जिल्ह्यातील सर्व कक्ष सुरु करावेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या अधिवेशनात घोषणा आणि अंमलबजावी करावी, ही सरकारला आमची विनंती असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

follow us