“..तर मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी CM होऊ शकतो” ; फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य

“..तर मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी CM होऊ शकतो” ; फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य

Ajit Pawar on Chief Minister Post : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. नागपुरातील राजभवन परिसरात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महायुतीच्या ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अगदी जाहीरपणे केले. मी सुद्धा अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजितदादा म्हणताच उपस्थित खळखळून हसले.

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा, दहा मंत्रिपदे; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्री

शपथ घेतलेल्या आमदारांत भाजपाचे १९, अजित पवार गटाचे ९ आणि शिंदे गटाच्या ११ आमदारांचा समावेश आहे. आता या मंत्र्‍यांना दोन दिवसांत खात्यांचं वाटप केलं जाईल अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रि‍पदे मिळाली आहेत. विदर्भ उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्रि‍पदे मिळाली आहेत. मागील शिंदे सरकारमधील एकूण १२ मंत्र्‍यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांच्या या धक्कातंत्राने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. यातच मंत्रि‍पदे अडीच वर्षांसाठीच असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अडीच वर्षांचा धागा पकडत मी अडीच महिन्यांसाठी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजित पवार यांनी म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला.

दरम्यान, यंदा मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना वगळण्यात आलं. त्यांच्या ऐवजी मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, इंद्रनील नाईक या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

मराठवाड्यातील सहा आमदारांना लाल दिवा; तीन नव्या चेहऱ्यांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री

भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण यांना डच्चू दिला आहे. एकनाथ शिंदे यांनीही दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या माजी मंत्र्‍यांना संधी नाकारली आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, आशिष जैस्वाल, संजय शिरसाट आणि योगेश कदम यांना पहिल्यांदाच मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube