मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा, दहा मंत्रिपदे; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्री

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा, दहा मंत्रिपदे; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्री

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज एकूण ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यातील ३३ आमदारांनी कॅबिनेट आणि सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. एकट्या पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण १० मंत्रि‍पदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रि‍पदे मिळाली आहेत.

टीम फडणवीस! ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ जणांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

यंदा मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना वगळण्यात आलं. त्यांच्या ऐवजी मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, इंद्रनील नाईक या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण यांना डच्चू दिला आहे. एकनाथ शिंदे यांनीही दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या माजी मंत्र्‍यांना संधी नाकारली आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, आशिष जैस्वाल, संजय शिरसाट आणि योगेश कदम यांना पहिल्यांदाच मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे.

पुणे फास्ट! जिल्ह्याला तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद; नगरला मात्र एकच लाल दिवा

विभागनिहाय तिन्ही पक्षांची मंत्रि‍पदे

पश्चिम महाराष्ट्र

भाजप

शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
जयकुमार गोरे
माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार (उपमुख्यंत्री)
दत्तात्रय भरणे
हसन मुश्रीफ
मकरंद पाटील

शिवसेना

शंभूराज देसाई
प्रकाश अबिटकर

विदर्भ

भाजप

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
चंद्रशेखर बावनकुळे
अशोक उईके
आकाश फुंडकर
पंकज भोयर (राज्यमंत्री)

शिवसेना

संजय राठोड
आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेस

इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

मराठवाडा

भाजप

पंकजा मुंडे
अतुल सावे
मेघना बोर्डीकर

शिवसेना

संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे
बाबासाहेब पाटील

मुंबई कोकण

भाजप

गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
नितेश राणे

शिवसेना

एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
उदय सामंत
भरत गोगावले
प्रताप सरनाईक
योगेश कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी

अदिती तटकरे

उत्तर महाराष्ट्र

भाजप

राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
जयकुमार रावल
संजय सावकारे

शिवसेना

गुलाबराव पाटील
दादा भुसे

राष्ट्रवादी काँग्रेस

माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवाळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube