Manoj Jarange Patil : राज्य सरकारला 29 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलायं, आरक्षण दिलं नाही तर 29 तारखेला निवडणुकांबाबत निर्णय घेणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरकारला दिलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच सरकारकडून सगेसोयऱ्याची मागणी मान्य होत नाही, सरकारला मागण्यांच निवदेन दिलंय मागण्या मान्य न झाल्यास निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.
दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघाची घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
मनोज जरांगे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी माझं काही बोलणं झालं नाही. येत्या 29 तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. आमच्या 5 ते 7 मागण्या आहेत. त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही 29 तारखेला निर्णय घेणार आहोत. सरकार वेड्यात काढत असून फसवत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं असल्याचंही मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
तसेच तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग आम्हाला तुम्हाला उमेदवारांना पाडावं लागणार आहे, सरकार सोबत आता कोणतीही चर्चा झाली नाही, उभे करायचे की पाडायचे हे ठरवू, पण यांची खुर्ची घालवणार, अधिवेशन आचारसंहिता असा यांचा वेळ काढूपणा चालला असल्याची टीकाही मनोज जरांगे यांनी यावेळी केलीयं.
अर्शद नदीम करणार पाकिस्तान क्रिकेट संघात एन्ट्री, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसणार ॲक्शनमध्ये?
मनोज जरांगे अन् संभाजीराजेंची भेट…
छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरू केली. त्यांचा स्वराज्य पक्ष विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. राजरत्न आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दरम्यान, जरांगेंशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती लवकरच करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले आहेत.
जाब विचारू नका यांना, २०२४ ला कायमची भूमिका विचारू हे आपल्याला काम लावत आहे. आपण यांचे नोकर आहे का? लोकांचा यांच्यावर राग असणारच सगळा रोष २०२४ ला दाखवू. सगळे लोक दरेकर यांच्यामुळे आंदोलन करत आहेत, दरेकर अनेकांच्या अंगात घुसला आहे. आरक्षण द्यायला १२ महिने लागत नाही, हे आरक्षण देत नाही असा अंदाज दिसत आहे. छगन भुजबळच्या नादात तुम्ही सत्त्ता घालवून बसणार
आहात. आम्ही सगळ्या तयारीला लागू, तुमचा कार्यक्रम लावणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिलायं.