Download App

‘पवारांनी एक गरीब मराठा मोठा केलेला दाखवा’; आमदार साटम यांचा जरांगेंच्या नथीतून पवारांवर बाण

शरद पवार यांनी एक गरीब मराठा मोठा केलेला दाखवा, या शब्दांत भाजपचे आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगे यांच्या नथीतून शरद पवारांवर बाण सोडलायं.

Mla Amit Satam On Manoj Jarange : शरद पवारांचा (Sharad Pawar) राजकारणात सगेसोयऱ्यांना मोठं करण हाच अध्यादेश, त्यांनी एक गरीब मराठा मोठा केलाला दाखवा, या शब्दांत भाजपचे आमदार अमित साटम (Amit satam) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नथीतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बाण सोडलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यानंतर आता अमित साटमही मैदानात उतरले आहेत.

अर्थसंकल्पापूर्वी मोठी बातमी; ‘या’ बँकेचं होणार खाजगीकरण; सरकारला किती हजार कोटी मिळणार?

अमित साटम म्हणाले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढाकार घेतला, प्राणांची पर्वा न करता आमरण उपोषण केलं. हे उपोषण पाहून मला आपल्याबद्दल खूप अभिमान वाटत होता. एकीकडे छत्रपती शिवरायांच्या आदर्शांचे पालन करीत होतात, कारण शिवराय युद्धावर जायचे तेव्हा रयत भरडली जाणार नाही, याची सक्त ताकीद द्यायचे, पण आता तुम्ही शरद पवारांच्या नादी लागून भरकटल्याची टीका अमित साटम यांनी केलीयं.

मनोज जरांगे यांच्या बोलण्यावरुन आणि वागण्यामुळे जे इतर समाजाचे आपल्याला संपूर्ण समर्थन मिळत होते, त्यापासून आता दुरावत चालला आहात. अजूनही वेळ गेलेली नाही. कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावं, अशीच प्रार्थना मी आई जगदंबेकडे करतो, कारण आपल्याकडे लाखो गरीब मराठा समाज आशेन बघत आहे. सगेसोयरे राजकारणात पुढे आणून त्यांनाचं मोठे करणे हाच पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिला असल्याचं म्हणत शरद पवारांवरही साटम यांनी बाण सोडलायं.

Sri Lanka vs India : सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार, गिलला उपकर्णधाराची लॉटरी; श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी संघ घोषित

जर मी चुकत असेल तर मी आपणास विनंती करतो की, आपण पवारांनी एखादा तरी गरीब मराठा कुटुंबातील मोठा केलेला मराठा दाखवावा. हे आपणास सांगायचे कारण की आपल्यात मराठा समाजाला दिशा व न्याय द्यायची कुवत आहे हे ते पण जाणतात आणि त्यामुळेच आपला पोलिटिकल गेम केला जात असल्याचा टोलाही अमित साटम यांनी लगावलायं.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं होतं. प्रसाद लाड हा बांडगूळ असून देवेंद्र फडणवीसांवर एवढंच प्रेम असेल तर त्यांच्याशी लग्न कर या शब्दांत जरांगे यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतला होता. आता प्रसाद लाड यांच्यानंतर अमित साटम यांनी जरांगेंनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता मनोज जरांगे अमित साटम यांच्या टीकेवर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us