…तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल; ‘ही’ नवी मागणी करत मनोज जरांगे पटलांचा सरकारला थेट इशारा

…तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल; ‘ही’ नवी मागणी करत मनोज जरांगे पटलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil press conference : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या काही दिवसांपासून चांगलीच आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळालं आहे. (Maratha Reservation) आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. (Manoj Jarange) त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे जरांगे पाटील सांगत आहेत. (Obc Reservation) तर दुसरीकडे ओबीसी समुहातून या मागणिला मोठा विरोध होत आहे.

गुलाल तुमच्यावर रुसेल मोठी बातमी! देशभरात गाजत असलेल्या;NEE परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षक ताब्यात

आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं आम्हाला कायद्याचा आधार आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणं करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पाशा पटेलांची कुणबी नोंद पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदार मोहितेंच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं, एकाचा मृत्यू

कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका, तुम्ही गुलालाचा अपमान करु नका. असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. कुणबी म्हणून सरकारी नोंदी या मुस्लिम समाजाच्या देखील निघाल्या आहेत. त्यांच्या नोंदी सरकारी निघाल्या तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर देखील अन्याय झाला नाही पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. पाशा पटेलांची देखील कुणबी म्हणून नोंद निघाल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.

तर आम्हाला राजकारणात उतरावं लागले

यावेळी जरांगे पाटलांनी थेट इशारा दिला आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर राजकारणात उतरावं लागेल. आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या, नाहीतर आम्ही कोणालाच आमचे समजणार नाही. ज्याच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. राजकारण आमचा मार्ग नाही. पण आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर आम्हाला राजकारणात उतरावं लागले असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज