Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Manoj Jarange :  मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Manoj Jarange : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावलीची माहिती समोर आली आहे. सध्या जरांगे पाटील यांची डॉक्टरांकडून तपासणी सुरु असून माहितीनुसार, त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या हृदयाची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

माहितीनुसार, सहा दिवसांपासून छत्रपची संभाजीनगरमधील (Sambhajinagar) गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते. शुक्रवारी पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्याच्या कमरेला झटका बसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा एकदा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, त्यांची रुग्णालयात ईसीजी आणि इको टूडी चाचणी करण्यात आली आहे.

सरकारला इशारा

तर मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी जरांगे म्हणाले, माझ्यासोबत कुणीच नाही जर तुम्हाला वाटतं असेल तुम्ही सरकार आहे मात्र मी तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून सांगतो. मी जनतेसाठी काम करत आहे, म्हणून मी ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाच्या मागण्या मांडत असतो.

माझ्या पाठीशी फक्त मराठा समाज आहे. जर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल अशा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला तसेच आमच्या नोंदी खऱ्या आहेत आणि आमची एकही नोंद रद्द झाली तर मंडळ कमिशनने दिलेल्या बोगस आरक्षणावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.

ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!

आम्हाला आमचे हक्काचे आरक्षण द्यावे. त्यांच्यासाठी समिती असेल तर आमचा काहीच आक्षेप नाही अशी देखील यावेळी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज