Download App

मराठी कलाकारांनी राजकारणात, विरोधी पक्षात असावं का ? अमोल कोल्हेंचा प्रश्न

पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत.

सोशल मिडीयावर देखील खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी कला कालाकारांनी राजकारणात यावं का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांनी विचारलंय की, काय वाटत तुम्हाला ?

या व्हिडीओबद्दल अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर सांगितले की, ‘मराठी कलाकारांनी राजकारणात यावं ? काय वाटतं तुम्हाला ? मला हा प्रश्न का पडला असावा आणि याचं उत्तर मी तुमच्याकडे का मागतोय, हे जाणून घेण्यासाठी #AmolTeAnmol या आपल्या #YT चॅनेल वरील व्हिडीओ आवर्जून पहा आणि हो तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका!’

या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे म्हणतात, ‘महाराष्ट्रात अगदी बोटवर मोजण्याइतके कलाकार राजकारणात आहेत. पश्चिम बंगाल आणि दक्षिणेतील राज्यात मात्र अनेक कलाकार सक्रीय राजकारणात आहेत. महाराष्ट्रात लोकांनी कलाकारांनी किंवा मराठी कलाकांरी सक्रीय राजकारणात येणं स्विकारलेलं नाही. कलाकारांनी किंवा मराठी कलाकांरी सक्रीय राजकारणात यायचं म्हणजे त्यांना करिअरवर परिणाम झाल्याचं दिसून येतं.

पवारांचं नाव घेतलं की गोप्याच्या XXXला आग लागली समजा, मिटकरींचा हल्लाबोल

पुढे अमोल कोल्हे म्हणतात, ‘कलाकारांनी कितीही रिअल आणि रिल लाईफ वेगळं ठेवण्याचा प्रयत्न तरी समोरचा नकार टाळू शकत नाही. राजकारणात असल्याने आपल्या देखील कशा संधी गेल्या ? हे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे असे अनुभव येत असतील तर मराठी कलाकरांनी राजकारणात येऊ नये का ? आणि राजकारणात आले तरी विरोधी पक्षात असू नये का ? तसेच राजकारणात गेल्यास कलाक्षेत्रात येऊ नये का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.’

कारण डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे घराघरांत पोहचले आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार असून ते राजकारणात सक्रीय देखील असतात. पण अनेकदा राजकीय पार्श्वभुमीमुळे कलाकरांच्या करिअरवर परिणाम झाल्याचं दिसून येत. त्यामुळेच अमोल कोल्हे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

Tags

follow us