पवारांचं नाव घेतलं की गोप्याच्या XXXला आग लागली समजा, मिटकरींचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मिटकरी यांनी पडळकर यांचा उल्लेख गोप्या असा केला आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे, असे म्हणत मिटकरी यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. याआधी गोपीचंद पडळकर यांनी काल इंदापूर येथे बोलताना शरद पवारांवर टीका केली होती.
मिटकरी यांनी पडळकरांच्या टिकेला जोरदार उत्तर दिले आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अशा शब्दात मिटकरींनी पडळकरांना डिवचले आहे.
हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023
Maharashtra Politics : ‘मेव्हण्याला वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा’
याआधी पडळकरांनी देखील पवारांवर तितक्याच जोरदार शब्दात टीका केली होती. मी पवारांचा विरोधात बोलतो कारण पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागलेली आहे. ती मुळापासून काढल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.
उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? राम कदमांचा सवाल
तसेच यांच्यापक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील, अजित पवार व सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे मी अशी विनंती करतो की, बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवारांना केले पाहिजे, लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंना करा व मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील यांना करा व या तीन राज्याचा एक देश करुन याचे पंतप्रधान शरद पवार यांना करा अशी मी मोदी साहेबांना विनंती करणार आहे, असा खोचक टोला पडळकरांनी पवारांना लगावला होता.