Aditya Thackeray : आदित्य ठाकरे हे गेल्या चार वर्षांहून अधिक काळ महाविकास आघाडीचे घटक बनले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार चालवत असताना त्यांना आता नवीन मित्र मिळाले आहेत. आता वय देखील वाढत आहे. त्यामुळे लग्न कधी करणार आहे. या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी प्रथमच सस्पेन्स फोडत उत्तर दिले आहे.
‘मुंबई तक’ या एका खासगी वृत्तवाहिनीने ‘राजकीय गप्पा’ सत्रात ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांनी रॅपिड फायर राऊंडमध्ये विविध प्रकारच्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद… सुप्रिया सुळे म्हणतात… – Letsupp
आपल्या लग्नाबद्दल आदित्य ठाकरे आपण काय विचार केला आहे. म्हणजे तुम्ही जसे वरळी आणि ठाण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात. तसे तुम्ही लग्न करताना मुलगी वरळी, ठाण्यातील करणार आहात की राजकारणातील करणार आहे. की वेगळ्याच क्षेत्रातील मुलगी करणार आहात?. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक कुटुंबात जशी लग्नाची गडबड असते तशी आमच्याकडे सुरु आहे. त्यामुळे लवकरच लग्न करेल, असे सांगत थेट प्रश्नाचं उत्तर देणे टाळले आहे.