शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद… सुप्रिया सुळे म्हणतात…

  • Written By: Published:
SUPRIYA SULE 1

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप बरोबर जॉईन होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर करून अजित पवार यांच्यावर दबाव आणला जात आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात की, एकतर माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. बारामती लोकसभा मतदार संघाची खासदार या नात्याने लोकांच्या अडचणी समस्या सोडवायच्या असतात. लोकांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कोण काय म्हणते याकडे पहायला किंवा लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही. तसेच गॉसिप याकडे मी फारसे लक्ष देत नाही.

बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केली आहे अवस्था पुण्याची? – Letsupp

तर अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना धरून जो आरोप केला आहे. तो त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मी अंजली दमानिया यांच्या मतावर काही बोलू शकत नाही. पण, एवढं नक्की सांगते. मी, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जे बोलले, चर्चा केली जात आहे. त्यामुळे आमचं ५५ वर्षांचं नाणं खणखणीत असल्याचे धोतक आहे. आम्ही राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहोत, हे ऐकून, वाचून आनंद होतो, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Tags

follow us