math has changed in Shevgaon Municipal Council; It will be expensive to Monika Rajale drop off to Loyal : अहिल्यानगर शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असणारे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांना डावलण्यात आले. त्यांच्या जागी रत्नमाला फलके यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे भाजपामध्ये अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. यातच आता विकास कामांवरून आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात असलेल्या लोकांमधली नाराजी व मुंडे यांना उमेदवारीवरून डावलण्यात आल्याने भाजपचे मुंडे समर्थक नाराज झाले आहे. एकनिष्ठांनाच डावलण्यात येत असल्याने आता कुठेतरी राजळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागेल असं चित्र निर्माण झाले आहे.
‘या’ राशींसाठी काहीसा प्रतिकूल तुमच्या राशीचे काय? जाणून घ्या आजचं राशिभविष्य…
शेवगावमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले व नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. यामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले व सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले अरुण मुंडे हे आपली पत्नी माया मुंडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. तर दुसरीकडे आमदार मोनिका राजळे या रत्नमाला फलके यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होत्या. माया मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी अरुण मुंडे यांनी थेट पक्षश्रेष्ठींशी देखील संवाद साधल्याची देखील चर्चा आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींशी असलेला कलह यामुळे मुंडे यांची उमेदवारी डावण्यात आल्याचे देखील चर्चा आहे.
उमेदवारीवरून डावलण्यात आल्यानंतर अरुण मुंडे यांनी शिवसेनेचे धनुष्य हाती उचलले पत्नी माया मुंडे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एबी फॉर्म मिळवत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. दरम्यान आता शेवगावमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्या अरुण लांडे राष्ट्रवादी शरद पवार गटातून प्रवीण एजाज काळजी शिवसेनेकडून माया मुंडे तर भाजपकडून रत्नमाला फलके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे.
एकनिष्ठांना डावलने विकास कामांचा अभाव राजळेंना अडचणीत आणणार?
शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे या तीन टर्मपासून लोकप्रतिनिधी आहेत. मात्र शेवगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या ही अद्यापही सोडवली गेली नाही. शहरामध्ये दहा ते पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो, तसेच शेवगाव शहरातील रस्ते अक्षरशः खड्डेमय झालेले आहे. शेवगाव शहरातील अतिक्रमण काढण्यात आले, मात्र पुन्हा ते त्या जागेवरती प्रस्थापित झाले यामुळे लोकप्रतिनिधींचे शेवगाव मतदार संघावरती कुठल्याही प्रकारची लक्ष नसल्याची भावना आता थेट नागरिक बोलवून दाखवत आहे. नागरी समस्यांकडे आमदार राजळे यांचे असलेले दुर्लक्ष कुठेतरी त्यांच्याच उमेदवारासाठी या निवडणुकीत अडचणीचं ठरू शकतं.
नाराजीनाट्याला विधानसभेची किनार
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अरुण मुंडे हे देखील उमेदवारीसाठी आग्रही होते . मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. अशी देखील मागणी त्यांनी केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडून पुन्हा एकदा राजळे यांना संधी देण्यात आली. दरम्यान उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या मुंडे यांनी जोरदार सभा घेऊन आपले राजकीय ताकद देखील दाखवून दिली होते. पक्षांतर्गत असलेला विरोध पाहता निवडणुकीनंतर मुंडे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. अशा पद्धतीची व्यूहरचना राजळे यांच्याकडूनच केली जात असल्याचा देखील आता मुंडे समर्थक खाजगीत बोलताना सांगतात.
निवडणुकीत कोणाचं पारडं जड?
शेवगाव नगरपरिषद निवडणूक ही प्रामुख्याने नागरी समस्यांवर लढली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या विद्या लांडे या यापूर्वीही नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्यामुळे शहराची व समस्यांची जाणीव त्यांना असल्याने त्या एक प्रबळ उमेदवार आहे तर त्यांच्यापुढे अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांचे देखील तगडे आव्हान असणार आहे. राजळे यांना संधी देऊनही मतदारसंघातले प्रश्न न सुटल्याने लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा सूर त्यांच्या उमेदवाराला भारी पडणार का? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून काझी प्रवीण एजाज हे देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत असून या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपातला अंतर्गत कलह राष्ट्रवादीसाठी फायद्याचा
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजळे व मुंडे समर्थकांमध्ये असलेले रस्सीखेच व यामध्ये राजळे यांचा वर्चस्व राहिला. राजळे यांनी आपल्या निकटवर्तीय रत्नमाला फलके यांना उमेदवारी अर्ज दिला. यामुळे नाराज असलेले मुंडे समर्थक यांनी देखील ठोस भूमिका घेतली. शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माया मुंडे व भाजपचे उमेदवार रत्नमाला मुंडे यांच्या थेट लढत झाली. तर पक्षांतर्गत असलेल्या कलामुळे ही मत विभागली जाणार व यामुळे याचा फायदा कुठेतरी पूर्वी नगराध्यक्ष राहिलेल्या व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून लढणाऱ्या विद्या लांडे यांना होईल असे देखील बोलले जाते. यामुळे भाजपचा अंतर्गत कलह कदाचित राष्ट्रवादीसाठी पूरक ठरू शकतो मात्र नगराध्यक्ष कोण होणार? हे येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी समजेल…
