…तरच मीरा भाईंदर निवडणुकीत महायुती होणार, प्रताप सरनाईकांनी मांडली स्पष्ट भूमिका

सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच मीरा भाईंदर निवडणुकीत महायुती होणार असल्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलीयं.

Untitle

Untitle

Pratap Sarnaik : पुढील काळात राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असताना शिंदे गटाकडून स्पष्ट भूमिका मांडली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक युती होत असेल तरच आम्ही महायुतीसाठी तयार असल्याचं विधान शिवेसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलंय. त्यामुळे आता मीरा भाईंदरमध्ये महायुती जागावाटपाचा मुद्दा कसा क्लिअर करणार? हा सवाल उपस्थित होत आहे.

नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट अधिवेशन, विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे, मीरा भाईंदरमध्ये महायुतीचच सरकार पाहिजे पण ही युती सन्मानपूर्वक होत असेल तरच युतीसाठी तयार. सन्मानपूर्वक युती होत असेल तरच आम्ही युतीसाठी तयार आहोत . भाजपला जितक्या जागा तितक्याचा जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत. ५०-५० चा फॉर्मुला हा शिवसेनेचा ठाम आग्रह असल्याचं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना सरकार रोजगार देणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल 

दरम्यान, सरनाईक यांच्या या वक्तव्यावरुन महायुतीतील जागावाटपाची चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून मीररा भाईंदर पालिका निवडणुकीत जागावाटपाचं समीकरण कसं ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप

Exit mobile version