Chagan Bhujbal News : आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून येण्यावरच अधिक लक्ष असून कोणालाही कमी लेखून चालत नसल्याचं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून भुजबळांनी आपली रणनीती माध्यमांसमोर सांगितली आहे.
नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर शस्त्रकिया; भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशन बनले देवदूत
छगन भुजबळ म्हणाले, निवडणुकांमध्ये कोणालाही कमी लेखून चालत नाही. आमचं सगळं लक्ष उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर लक्ष आहे. अलीकडे निवडणुका वेगळा झाल्या आहेत प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचे लक्ष असतं, असं विधान भुजबळ यांनी केलं आहे.
आपल्या येवला-मनमाड-लासलगाव मतदार क्षेत्र आणि एवढा मतदार क्षेत्रातील नागरिकांची मागणी होत आहे की आम्हाला आयोध्येला जायचं
लाखो लोक जातात कोणी पंढरपूरला जातं कोणी काशीला जातं. अनेक लोक आहेत त्यांना अयोध्येला जायचं म्हणत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
हुश्श! कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या अखेर जेरबंद; 48 तासांनंतर पिंजऱ्यात अडकला
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरही भुजबळांनी भाष्य केलं असून आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक झाली असूनकाही प्राथमिक चर्चा झाली आहे. आणखी दोन दिवसांनी चर्चा झाल्यानंतर जागावाटपांच फायनल होईल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच आम्ही दहा-बारा जागेवर दावा केला असून आम्हाला या जागा निवडणूक लढवण्यासाठी सोयीस्कर आहेत म्हणूनच मागणी केली आहे. आम्हाला किती जागा मिळणार तुमची काही माहिती असेल तर सांगा. मला एवढंच माहिती आहे की बऱ्यापैकी जागा मिळणार असल्याचा विश्वासछगन भुजबळांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडून यांनीही मोठा दावा केला आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे आमदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं कडू म्हणाले आहेत. त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं असून ते म्हणाले, ती त्यांची माहिती आहे आमची माहिती वेगळी आहे आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची निशाणी घड्याळ आहे घड्याळ निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.