भुजबळ कुटुंब दिसले की मारायला सांगतात; छगन भुजबळांचा जरांगेंवर गंभीर आरोप
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज व ओबीसीमध्ये संघर्ष पाहिला. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange/strong>) व अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकमेंकावर थेट आणि जहरी टीका करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ व जरांगे एकमेंकावर तुटून पडत आहे. नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचा मुलगा व माजी आमदार पंकज भुजबळ/strong> (Pankaj Bhujbal) यांचे वाहन अडवून, त्यांना माघारी पाठविण्यात आले. त्यावरून आता भुजबळ यांनी जरांगेंवर एक गंभीर आरोप केला आहे. भुजबळ कुटुंबातील सदस्य दिसले की मारायला सांगतात, असा आरोप भुजबळांचा आहे.
PM मोदींचा मास्टरस्ट्रोक! भाजपने साधले महाराष्ट्र, UP अन् कर्नाटकमधील लोकसभेच्या 100 जागांचे गणित
छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी मी पाठिंबा दिलेला आहे. स्वतंत्र आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आंदोलन का गेले जात आहे. आता शांतता बिघडण्याचे कारण नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रत्येक जण ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना अडविणे योग्य होणार नाही. हे लोकशाहीविरुद्ध आहे. पंकज भुजबळ यांना अडविणारे मराठा समाजाचे लोक होते की स्थानिक राजकीय लोक होते, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
काकस्पर्श ते ही अनोखी गाठ मांजरेकरांनी सांगितली चित्रपटांमागची खास स्ट्रॅटेजी
जरांगे हे भुजबळांच्या कुटुंबाचे हातपाय तोडून टाका, असे सांगतात. हे सगळे एेकूण पोलिस शांत राहतात. कारवाई का करत नाही ? गृहमंत्रालय काय करत आहे, असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे. भुजबळ कुटुंब कधीही घाबरलेले नाही. मी अनेकदा घरावर झालेल्या हल्ल्यांचा सामना केलेला आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमी वातावरण बिघडण्याची प्रयत्न करू नये. सत्य लपवून राहत नाही. हळूहळू काही गोष्टी बाहेर येतील. जरांगेंना चुकीचे सल्ले देणारे कोण लोक आहे ते ही समोर येईल, असा दावाही भुजबळांना केला आहे.
पंकज भुजबळांबाबत काय घडले ?
गुरुवारी माजी आमदार पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. या मतदारसंघाचा काही मालेगाव तालुक्यात आहे. या तालुक्यातील मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वराने या भागात पंकज भुजबळांचा दौरा होता. नगाव येथे पंकज भुजबळांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थकांनी विरोध केला. पकंज भुजबळांचा निषेधही करण्यात आला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होती. शेवटी पंकज भुजबळ हे तिथून परत निघून गेले आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी अपमानास्पद व्यक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे मराठा समाजाची माफी मागावे, त्यानंतर त्यांना मतदारसंघात दौरा करू देई, अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.