Download App

बाळासाहेब असते तर लाथच घातली असती; बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टीका

बाळासाहेब आज असते तर त्यांनी बुडावर लाथच घातली असती, या शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीयं.

Chandrashekhar Bawankule On Udhav Thackeray ; बाळासाहेबांचा आवाज वापरुन त्यांच्या विचारांचा द्रोह केला , बाळासाहेब आज असते तर त्यांनी बुडावर लाथच घातली असती, या शब्दांत भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलीयं.

Video : कराडचा गेम धनंजय मुंडेच करू शकतात; भाजपचं नाव घेत करूणा मुंडे काय म्हणाल्या..

पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवलेत. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका, ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरवले, टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला दिले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, आज बाळासाहबे असते तर बुडावर लाथच घातली असती, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

मराठवाड्यावर पुन्हा पाणी संकट; तब्बल १५२ प्रकल्प कोरडे ठाक, जलसंपदा विभागाची माहिती काय?

तसेच आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो असे बावनकुळे म्हणाले. मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरवले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, अशीही टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.

follow us