मुख्यमंत्री फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule On Harshvardhan Sapkal : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबची कबर हटवण्यात यावी अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. यातच काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तुलना औरंगजेबशी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केला असं म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केला आहे. काँग्रेसचे हे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष स्वतःला गांधीवादी म्हणवून घेतात, महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसतात आणि दुसरीकडे गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य करतात. सपकाळ यांचे हे सोंग साऱ्या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे. असं त्यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेब्याशी करून छत्रपती शिवरायांचा अपमान : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केला आहे. काँग्रेसचे हे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष स्वतःला गांधीवादी म्हणवून घेतात, महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसतात आणि दुसरीकडे गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य करतात.
सपकाळ यांचे हे सोंग साऱ्या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे. आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी विधायक आणि रचनात्मक कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ते पुढे नेत आहेत. असे असताना त्यांनी आदरणीय देवेंद्र जी यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेब्याशी करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे.
दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 16, 2025
अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिलेल्या आणि अलीकडेच दिल्लीतून थेट राज्यात आलेल्या नवशिक्या सपकाळ यांना देवेंद्र जी यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती असण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षातील राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केली असती तर असे संतापजनक विधान करण्यास ते धजावले नसते. असं त्यांनी एक्सवर म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते की, औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे.
2002 पूर्वी गुजरातमध्ये…, गुजरात दंगलींवर पंतप्रधान मोदींचा मोठा गौप्यस्फोट
औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.