Chhagan Bhujbal On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्यचाी मागणी केली. त्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यावरून भुजबळ आणि जरागे एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. आता विधानसभा निवडणूक लढवण्यावरून भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
… तर लाडकी बहीण योजना बंद होणार, अजित पवार स्पष्टच बोलले
जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत लढायचं की पाडायचं याचा निर्णय २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे. येवला मतदारसंघात भुजबळांच्या विरोधात मनोज जरांगे यांचा उमेदवार राहणार का? अशी चर्चा सुरू असतानाच विधानसभा निवडणूक लढवण्याच्या जरांगेंच्या विचाराची भुजबळांनी खिल्ली उडवली. भुजबळ म्हणाले, त्यांना मी सांगितलं आहे, आगामी विधानसभा मतदारसंघात 288 जागांवर उमेदवार द्या, त्यासाठी तयारी करा. मला शिव्या देऊन काय फायदा आहे? तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या. तुमचे उमेदवार निवडून येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार. आणखी काय काय होणार… पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर शिव्याशाप देऊन चालत नाही, त्यामुळे आतापासून वागणं सुधारलं पाहिजे, असा टोला भुजबळांनी लगावला.
बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवा, त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा…; संभाजी भिडे आक्रमक
मनोज जरांगे यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी होणाऱ्या सभेसाठी पाच लाखांची गर्दी होणार असा दावा जरांगेंनी केला होता. मात्र पोलिसांच्या अहवालानुसार केवळ आठ हजार लोक सभेला जमले होते, असं सांगत भुजबळांनी जरांगेंच्या दाव्याची खिल्ली उडवली. आंदोलन सुरू झाल्यापासून जरांगे मला शिव्या देत आहेत. मला शिव्या देण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वादग्रस्त विधान करणारे महंत रामगिरी महाराजांबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, प्रबोधन करताना दुसऱ्या धर्मांचा उल्लेख टाळावा, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला भुजबळांनी दिला.