Download App

राष्ट्रवादीत ठिणग्या! मुश्रीफ हे सिनियर, त्यांचे ऐकले पाहिजे…; छगन भुजबळांचा टोमणा

हसन मुश्रीफांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मुश्रीफ हे सिनियर, त्यामुळे त्यांचे ऐकलं पाहिजे, असा टोमना त्यांनी लगावला.

Chhagan Bhujbal On Hasan Mushrif : दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती (Manusmriti) दहन करतांना अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडले. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपने (BJP) आव्हाडांवर जोरदार टीका केली. तर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांची पाठराखन केली. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) भुजबळांवर निशाणा साधाला. मुश्रीफांच्या टीकेला आता भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा प्रताप! 3000 सेक्स व्हिडीओ; वाचा, देशाला हादरवणारं सेक्स कँडल 

मुश्रीफ यांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मुश्रीफ हे सिनियर आहेत. त्यामुळे त्यांचे ऐकलं पाहिजे, या एका वाक्यात त्यांनी हा विषय संपवला.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मुश्रीफांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, ते सिनियर आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांवर काय टीका करायची ती करा. पण, टीका करायचा अधिकार तुम्हाला कधी येतो, तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराला त्या वेळेला तो अधिकार येईल. मनुस्मृति ठेवतात बाजूला अन् जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड सुरू केलंय, असं भुजबळ म्हणाले.

Pune Accident : डॉ. तावरेला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न होतोय; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप 

पुढं बोलतांना ते म्हणाले, त्यांना काय शिक्षा करायची ती शिक्षा करा, माझं काहीही म्हणणं नाही. पण जे तुम्ही करणारे-बोलणारे आहात. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. मला मान्य आहे ते, असलेच पाहिजे. बाळासाहेबांना नको असलेली बहुजन समालाजा नको असलेली मनुस्मृतीचा तुम्ही निषेध करायला पाहिजे. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करू नये, एवढचं माझं म्हणणं आहे. बाकी सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार, असं त्यांनी म्हटलं.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखन केल्यानं हसन मुश्रीफांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडणे हे निंदणीयच आहे. पण, आमचे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कोठेतरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं विधान भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ यांनी आव्हाडांनी फटकारायला हवे होते. त्यांची ही कृती अत्यंत चुकीची आहे, अशी टीका मुश्रीफांनी केली.

follow us

वेब स्टोरीज