Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत.
उद्या धनंजय मुंडे भगवानगडावर पूजा करणार आहेत. त्यासोबत मुंडे महंत नामदेव शास्त्रींसोबत चर्चा करीत आहेत. धनंजय मुंडे अचानक भगवान गडावर का पोहोचले? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. भगवान गड हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. उद्या ते या ठिकाणी पूजा देखील करणार आहेत. एकंदरीत जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा भगवान गडावरील मुक्काम महत्वाचा मानला जातोय.
सर्वांना आनंद देणारा दिवस…अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे आज अहिल्यानगर दौऱ्यावर येणार होते. परंतु ते अहिल्यानगर आले नाहीत. राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय. तर कराड मंत्री मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. काही सत्ताधारी अन् विरोधक नेत्यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलंय. तर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर अजित पवार आज बीडमध्ये होते. त्यांनी जिल्हा नियोजनाची बैठक देखील घेतली.
Budget 2025 : महिला अन् नोकरदारांना दिलासा…अर्थसंकल्पात ‘या’ पाच मोठ्या घोषणा होण्याची शक्यता…
या बैठकीत अजित पवारांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी धनंजय मुंडे हाताची घडी घालून बाजूला उभे होते. वाल्मिक कराडचे रोज नवे प्रताप समोर येत आहेत. तर काल मुंडेंनी दिल्लीत प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत होते. महायुतीत अंतर्गत दबाव वाढताना दिसतोय. अशा संकटकाळातच मुंडेंनी भगवान गडावर धाव घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.