भारत स्वतःचं AI Model तयार करणार… यावर्षीच लॉन्च होणार; केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
India Set To Develop Own Generative AI Model : भारत देखील AI मॉडेल्सच्या (AI Model) वेगवान शर्यतीत सामील होण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) घोषणा केलीय की, भारत (India) स्वतःचे एआय मॉडेल देखील तयार करेल अन् ते यावर्षी लॉन्च केले जाईल. एआय मॉडेल्सच्या तीव्रतेच्या शर्यतीत भारतानेही तयारी केलीये.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की, OpenAI च्या ChatGPT आणि चीनच्या DeepSeek च्या धर्तीवर भारत देखील स्वतःचे जनरेटिव्ह AI मॉडेल लॉन्च करेल. ओडिसातील एका कार्यक्रमात याची घोषणा करताना वैष्णव म्हणाले की, हे मॉडेल या वर्षीच लाँच केलं जाईल.
आर्मी हेलिकॉप्टरला धडकलेल्या अमेरिकन विमानातील सर्व 64 जणांचा मृत्यू ? 28 मृतदेह सापडले
केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारतात असे किमान सहा मोठे विकासक आहेत. ते जास्तीत जास्त 6-8 महिन्यांत AI मॉडेल (Indias AI Model) तयार करू शकतात. एक मजबूत एआय इकोसिस्टम तयार करण्यासाठी, सामान्य गणना सुविधा असणं महत्वाचं आहे. भारताचे AI मिशन लक्षात घेऊन, सरकारने सामायिक संगणकीय संसाधने उभारण्यास प्राधान्य दिलंय. मंत्री पुढे म्हणाले की, इंडिया एआय कॉम्प्युट सुविधेने अपेक्षेपेक्षा जास्त केले आहे. सुमारे 19,000 GPU प्राप्त केलेत. यापैकी 12,896 Nvidia H100 GPU आणि 1,480 Nvidia H200 GPU आहेत. यापैकी 10,000 GPU आता वापरासाठी तयार आहेत. ही सुविधा सर्वांसाठी खुली राहणार असून येत्या काही दिवसांत त्याचं काम सुरू होईल.
Sam David : बॉलिवूडचा मॉडेल बनला सायबर गुन्हेगार; सॅम उर्फ डेव्हिडचं इंटरनॅशनल टोळीशी कनेक्शन
भारत स्वतःचे फाउंडेशन एआय मॉडेल तयार करेल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्र्यांनी केली. भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन त्याचा डेटासेट तयार केला जाईल. जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही. ते म्हणाले की, AI मॉडेल तयार करण्यात स्वारस्य असलेले विकासक त्यांचे प्रस्ताव दाखल करू शकतात.
हे मॉडेल 6-8 महिन्यांत तयार करावे लागेल. OpenAI ने 2023 च्या उत्तरार्धात ChatGPT लाँच करून AI मॉडेल्सची शर्यत सुरू केली. यानंतर अनेक कंपन्या या शर्यतीत सामील झाल्या. अलीकडच्या काळात, चीनी स्टार्टअप्सच्या एआय मॉडेल्सनी संपूर्ण चित्र बदललं आहे. चीनने अमेरिकन कंपन्यांपेक्षा खूपच कमी खर्चात एआय मॉडेल विकसित केलेत.